पान:आलेख.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




दिली आहे. आणि इथे हळूच स्वभाव व्यक्त झाला आहे.

   अशी लाडकी गंधाली

    माऊलीच्या सावलीत.

   कुठे तिष्ठताहे हिचा

    वनमाळी भाग्यवंत?

 तुला नजराणा म्हणून सारा पसारा मांडला आहे. पण दुर्दैवाने त्यात मन

कोंडले जाते. आणि नेहमीचेच आक्रंदन आर्ततेने त्यांच्या 'तेवढे तरी राहू दे' (पृ.८२)

या कवितेत व्यक्त होते. 'तुझी आवड म्हणून साडीवरचे रेशीम काम करावे, तुझे-

कौतुक म्हणूनच सजावे. तुला नजराणा म्हणून डोळ्यात रेखण्यासाठी घूसर मेघांचे

काजळ धरावे., पण एका एकी 'सारेच कसे घुसमटून गेले' शेवटी शिल्लक 'मग

मनाचा आक्रोश : तो पू: विराम तरी माझ्यासाठी राहु दे. तेवढा तरी राहू दें

 अशी सतत आठवते एक संपलेली सोबत (पृ. ९०) दुःख अधिकच तीव्र

बनते. न सोसणारे हे दुःखच सर्वत्र प्रेम कवितेत व्यक्त होते. क्वचित 'गंधालो'

सारखी सर्वांगसुंदर आणि सर्वश्रेष्ठ कविता यौवनाची शान साकार करणारी, वाट

पाहणारी आणि पहायला लावणारी अवतरते. एकंदरीत इंदिरा संतांचे प्रणयानुभव

वेदनेभोवती रुंजी घालणारे-मनातले कढ साकार करणारेच आहेत असे म्हटल्यास

फारसे वावगे होणार नाही.

तीन

 इंदिरा संतांच्या 'बाहुल्या' या संग्रहातील कवितातील विविध स्वरूपी भाव-

विश्वाचा विचार करताना प्रणयभावनेचा आविष्कार, 'मानवी जीवनाचे स्वरूप

निसर्ग, स्त्री-जीवन चित्रणे, इत्यादि बगेबरच बाहुल्यातील कविता वाचून त्यातील

प्रगट झालेल्या कविमनाचा साकल्याने विचार करावा लागतो. 'बाहुल्या' वाचीत

असतांना आपणास इंदिरा संतांच्या प्रगल्भ, परिपक्व, कलात्मक व्यक्तित्वाची

जाणिव होते. या पूर्वीच्या काव्यसंग्रहात हे कविमन पति विरहाच्याच भावनेचे

विविध रंग टिपण्यात गुंग झाले होते. इथे मात्र काही वेगळ्या गोष्टीवर हे मन

आपले लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नान दिसते. असा वेगळेपणा त्यांच्या 'सहवास',

"रंगबावरी' या संग्रहातही पहावयास मिळतो. बाहुल्या हा त्यांचा १९७२ साली

प्रसिद्ध झालेला काव्यसंग्रह. त्यात अनुभूतीच्या बदलत्या विश्वाची अधिकच जाणिव

स्पष्ट होते. अर्थात काही कविता उत्कट पतीस्मृती मंधाने दरवळणाऱ्या यातही

आहेत. असे जाणवतेच ! अशा कविता हाच खरा त्यांच्या कवित्व सामर्थ्याचा
४६           आलेख