पान:आलेख.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




  नाही जावयाचे सत्त्व,

   नाही रहावायाचे ऋण :

  घेऊनिया जन्म जन्म

   देणे एवढे फेडीन (देणे : पृ.. ७)

  यातच जीवन सर्वस्व त्यांनी मानले आहे.

   माझे आनंद निधान

    तोच एक सायंतारा

   माझ्या जीवनाचा तोच

    पूर्ण विराम हासरा    (आनंदनिधान. पृ. २१)

 'देव देव्हारा मांडला' पृ. २६ या कवितेत ध्यानस्थ देव देव्हाऱ्यातील श्रद्धा

नाहीशी व्हावी अशी घटना जीवनात घडते मग भावच उन्मळून पडतो.

   एका भीषण लाटेने

    गेले धुवून जीवन

   गेला देव धर्म, गेले

   जे जे कोमल प्रसन्न

    हेच फक्त आता उरले आहे.

   'तुझ्या पावलांची खूण

 फूल तिथेच वाहिले' केवढी ही श्रद्धा भक्ती ! येणारा तो (पृ. ६०) येतोच

आहे. कारण अनामिक बंधनातीत हे नाते आहे. म्हणूनच-

   कुठे मोगरा फुलला

    इथे दऱ्वळ. पोचला:

   येणार तो येत आहे

    खूण मिळाली मनाला.

 शेवटी रस्ता तोच 'पृ. ६१ मध्येही हीच 'व्यथा साकार झाली आहे. सारे

काही तेच तेच आहे. तोच रस्ता, तेच आंगण, तेच मेंदीचे कुंपण, त्याच रेखीव

पायऱ्या पण पुढे सारे अनोखे आहे . निरोप देणे कठीण ! श्वास शद्वांतही परके-

पणा आहे-

   एका घोटात गिळून

    पाय रस्त्यावरौं यांचे

   आणि उरल्या रस्त्याचे

    रस्तेपणच संपावे.

 'गंधाली' (प. ६२) चे अप्रुप वर्णन करतांना कवितेला मार्मिक कलाटणी


आलेख           ४५