पान:आलेख.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




वैचित्र्यपूर्ण भाववृत्ती रंगबावरीतून व्यक्त झाल्या. व्यक्तिवादी प्रतिमा विश्वापेक्षा

शब्दातूनच चित्रे अत्यंत यशस्वीपणे साकार करणारी ही कविता बनली. त्यांचा

हा रुची पालट रंगबावरी नंतर 'बाहुल्या' : मध्येही प्रकर्षान जाणवल्या शिवाय

रहात नाही.

 सहवास मृगजळ, शेला, मेंदी, रंगबावरी, 'बाहुल्या' या इंदिरा संतांच्या

सर्व काव्यसंग्रहातून-प्रणय भावना अत्यंत तरल सूक्ष्म, उत्कट आणि गहिऱ्या रूपात

अर्थातच कमी अधिक प्रमाणात व्यक्त झालेली दिसते. तुलनात्मक दृष्ट्या विचार

केला तर प्रस्तुत 'बाहुल्या' संग्रहात इंदिरा संतांच्या प्रतिभेचा संचार प्रीतिविव्हल

अनुभवाच्या आवर्तीतून बाहेर पडून जीवनाच्या अन्य दालनात होताना दिसत

असल्यामुळे प्रेमानुभवांना व्यक्त करणाऱ्या कवितांची संख्या अल्पं आहे. तथापि

प्रणयानुभूती इथेही अत्यंत सखोल, अंतराचा ठाव घेणारीच त्या चित्रित करताना

दिसतात. त्यांच्या कवितेचे बलस्थान अंतीमतः ही प्रेमकविताचं आहे.

 दुदैवाने पतीच्या अकाली झालेल्या निधनामुळं पती चिरविरहाच्या जाणिवेने

व्याकूल होऊन एकाच स्वरूपाच्या प्रेम भावनेच्या नानाविधपरी विविध परिमाणा-,

सह इंदिरा संत अत्यंत यशस्वीपणे अभिव्यक्त करतात . एकच एक भावना किती

खोलात शिरून, किती विविध भूमिकेतून व्यक्त करता येते याचे उत्तम उदाहरण

म्हणजे मृगजळ, शेला, मेंदी यातील प्रेम कविता म्हणून निर्देशता येईल. 'रंगबावरी'

आणि 'बाहुल्या' मध्ये संख्येने कमी अशा स्मरूपाच्या कविता आढळतील. कारण

हे कवी मन आता अन्यत्र स्वतःला रमवू पहात आहे. निदान विरंगुळा म्हणून तरी!

असे वाटणारी त्यांची. या दोन संग्रहातील कविता आहे.

 'एक तुझी आठवण' (पृ.४०) या कवितेतील नित्याचा, दिवंगत पतीचे

स्मरण करून देणारा अनुभव आहे. काळीज कापणारी व्यथा ही आठवण आहे

पण ही व्यथा भरतीच्या लाटेसारखी, सळसळणान्या वीजेसारखी, सुगंधी वायाः

सारखी अशी विभिन्न भावस्वरूपी आहे. ती आठवण हेच सर्वस्व आहे.

   आणि माझी मनवेल

  कोसळते थरारुन; असे असले तरी-

 मुक्त झाली माझ्यातून

  माझ्या इवल्या विश्वाला

 झाली गगन निर्गुण....

प्रियकराचे देणे देऊ म्हटले तरी देता येत नाही. तरी पण प्रबळ आशा आहे-

. ४४          आलेख