पान:आलेख.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




ऱ्यावर पसरलेली वाळू यांच्यात विविध मुग्ध प्रणयिनीची उत्कट प्रीती दृष्टौप्रत्तीस

येते. सागरावर लुब्ध म्हणून त्याच्या प्रेमासाठी या प्रेयसी झुरताहेत असे कल्पना-

चित्र मोठ्या समर्थपणे 'सागरा' सारख्या कवितेत त्या रेखाटतात. कमालीच्या

समरसतेतून आशय इथे काव्यरुप धारण करताना आढळतो. या अभिव्यक्तित

कुठेही अलंकरणाचा सोस नसला तरी प्राचीन स्त्रियांच्या गीताप्रमाणे - ओवीप्रमाणे

साध्या, सरळ अर्थवाही मृदु पण निवडक शब्दात सहजपणे हे टिपलेले असते. अकृ.

त्रिम कल्पना सौंदर्य त्याच्या मनोहर रुपात अशा कवितांतून त्या व्यक्त करतात.

असो. त्याची ही कविता म्हणजे भावगीतांच्याच प्रकृतीची आहे.

 सौजन्य, शालीनता, सुसंस्कृतता, औचित्याची सुजाग जाणीव, कौटुंबिक आणि

घरातील सुखदुःखाची हळुवार चित्रे समरसून टिपणारी भावोत्कटता, रचनेतील

संयम, सूचकता, संवेदनशीलता या इंदिरा संतांच्या कवितेत जाणवणाऱ्या विशेषां-

मुळे त्यांची कविता जुन्यानव्या सर्वच रसिकात मान्यता पावली आहे. एखादी

भावना व्यापक स्वरूपात व्यक्त करण्या ऐवजी ती अधिक उत्कटतेने काव्यस्वरुपात

निवडक शब्दात अधिक टोकदार व धारदार बनवून तीव्र स्वरूपात अभिव्यक्त

करणे हा इंदिरा संतांच्या वाङ्मयीन व्यक्तित्वाचा मननीय धर्म आहे.

दोन

 मराठी स्त्री कवयित्रींच्या मध्ये इंदिरा संतांना ज्येष्ठताचा मान देणे इष्ट

आहे. रविकिरण मंडळाच्या काळात त्यांनी आपल्या काव्य लेखनाला प्रारंभ केला

असला तरी लवकरच नव्या वाटेने या कवितेचा प्रवास झाला असे आपणास दिसून

येईल. मराठी प्राचीन संत साहित्याने रुढ केलेल्या आणि रुजविलेल्या ओवी, अभंग

या छंदातूनच इंदिरा संतांनी आपले मनोभाव समर्थपणे व्यक्त केले आहेत. 'सहवास'

ते 'बाहुल्या' प्रवासात हे जाणवते. प्राचीन संतांच्या अभंग, ओवी सारखाच त्यांच्या

कवितेचा बाह्य तोंडावळा दिसत असला तरी भावना विकारात स्वतंत्रपणा आणि

त्यांच्या अभिव्यक्तीतील वेगळेपणाही प्रगट होत होता. अलिकडे मात्र इंदिरा

संतांनी ओवी अभंगापेक्षा मुक्त छंदात अधिक काव्यलेखन केल्याचे दिसून येते.

'बाहुल्या'त या विशेषताने प्रत्यय येतो. भावनानुरुप प्रतिमा योजनेतील नाविण्या

बरोबरच आत्ममग्न असे त्यांचे मनही कवितेतून लक्षात येते. यातूनच गूढता,

व्यामिश्र अनुभव, प्रखर आत्मनिष्ठा कवितेतून व्यक्त होते. सूक्ष्म. भावच्छटांना

तेवढयाच सूक्ष्म आणि कोमल शब्दात त्या समर्थपणे व्यक्त करतात. रंगबावरी,

यौन निळया, स्पर्श, हिरवे, रक्तवेडी, सोन हासरी या नव्या काव्यमय शब्दात ही

. ४२            आलेख