पान:आलेख.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




  'तुजवीण आता, तुझ्या या संसारी

  अंगाराच्या सरी, वर्षतात

  आत बाहेरून, लागलीसे आग

  तुझा घेत माग,येऊ कोठे?'

 या व्यथेनेच त्यांचे सारे विश्व भरून गेलेले दिसते. प्रामुख्याने हीच भावना

त्यांच्या काव्यातून व्यक्त होत असली तरी त्याच्या प्रतिभेला विविध भावनांची

प्रत्ययकारी चित्रेही साकार करता येतात. याचा प्रत्यय 'रंगबावरी' आणि 'बाहुल्या

या दोन काव्यसंग्रहात आल्याशिवाय रहात नाही. पण कलावंत, सहृदय-रसिक

अशा प्रेमळ पतीच्या विविध स्वरूपाच्या आठवणी-विविध प्रसंगाच्या भावतरंगांना

साकार करणारीच त्यांची बहुसंख्य कविता निर्विवाद आहे.

 'मेंदी-मृगजळ ही इंदिरा संतांची कविता म्हणजे 'ठिपक्यांची संख्या तीच

राहून रांगोळी मात्र बदलते आहे' असे प्रा. ल. ग. जोग यांना वाटते'. (दीपस्तंभ-

पृ. २७) कमालीची आर्तता आणि पराकोटीचा हळुवारपणा, सूकोमलता त्यांच्या

काव्यात आहे. याच वृत्तीचा आविष्कार त्यांच्या 'रंगबावरी' 'बाहुल्या' मधील काही

कवितातून वेगवेगळ्या संदर्भात झालेला दिसतो. मात्र अंतर्मुख होऊन लिहिलेली

कविता पतीच्या भावस्मृती सुगंधातच मग्न झालेली दिसते. क्वचित या विश्वातून

बाहेर येण्याचा प्रयत्न आढळत असला तरी पुन्हा पुन्हा त्याच स्मृति सुगंधाकडे

त्यांची कविता झेपावते असे दिसते. किंबहुना तेच त्यांच्या कवितेचे एकमेव बलस्थान-

आहे. असेही म्हणता येईल.

 आत्मनिष्ठ-आत्मप्रत्ययाने रसरसलेल्या त्यांच्या या कवितेत वात्सल्य, मातेचे

निसर्गाचे विलक्षण प्रेम, या वृत्तीची साथ सोबत करणाऱ्या म्हणून व्यक्त

झाल्या आहेत. ओघात का होईना पण त्यांच्या कवितेत आलेली निसंगचित्रे ही

उत्कृष्ट भावचिवेच आहेत. व्यक्तिमत्वाच्या रंगातच हे निसर्ग रंग मिसळले

आहेत. मानवी भाव भावनांच्या अभिव्यक्तिसाठी हा निसर्ग आलेला आहे. इथेच

त्यांच्या आशयाच्या समर्थ अभिव्यक्ति पद्धतीची ही जाणीव होते. कोमल, तरल,

अनुभवाची लय टिपणारे प्रतिभा विश्व त्यांच्या कवितात भावाभिव्यक्ति साठीच

केवळ अवतरलेले दिसते.

तशी त्यांची प्रतिभा सर्वस्पर्शी आहेच. म्हणूनच निसर्गातील सामान्य घडामोडीत

आणि घटनांतही त्यांना भावनांचे रंग मिसवलेले दिसतात. साध्या, क्षुद्र उबक्यांतही

योग्याची तपश्चर्या दिसते आणि अशाच एखाद्या सामान्य जीवनाची अंतःकाळची

तहान भागविल्याचे समाधान दिसते; तर सागरवेली, नारळी आणि सागरकिना-

आलेख          ४१