पान:आलेख.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




जिवाच्या जिवलगाच्या सान्निध्यात रमणारे 'सहवास' मधील कवयित्रीचे मन पती

अंतरल्यामुळे यानंतर आपल्या प्राणवल्लभाच्या विरहाने व्याकूळ झाले. ही व्यथा

हाच त्यांच्या 'सहवास' नंतरच्या काव्यसंग्रहातून प्रत्ययाला येणारा काव्यानुभव

आहे. पति-विरहाची तीव्र जाणीव हीच त्यांच्या काव्यलेखनामागील प्रेरणा ठरली.

हळुवारपणे चिंतनशील वृत्तीची आणि सूक्ष्मतर कलादृष्टीची साक्ष त्यांच्या या

काव्यसंग्रहातून मिळते. व्यक्तिगत भाव जीवनाने त्यांची काव्यसृष्टी एका अर्थाने

सीमित झाली आहे; असे काही समीक्षकांचे म्हणणं अन्याय करणारे म्हणावे

लागेल. सर्व भाववृत्तींच्या चित्रणाची किंवा विविध अनुभवांची अभिव्यक्ति अपे-

क्षिणे तीही एकाच कविमनाकडून तेवढे न्याय्य ठरणार नाही असे सुचवावेसे वाटते.

 इंदिरा संतनिी आपल्या काव्यातून ही मनोव्यथा निसर्गातील विविध प्रति-

मांच्या साहाय्याने संयत मनाने आणि सूचकतेने चित्रित केल्या आहेत. एका हृदय-

विदारक स्मृतीतून स्फुरलेली आणि असहय वेदनांनी भरलेली ही भावकविता

रेखीव-पृथगात्म - निवडक (Selective) शब्दसृष्टीतून उमलली आहे.

  "होते माझी मला पारखी

  पटे न ओळख, होते वेडी,

  वेदांतच त्या डुबते, बुडते

  बसते उलगत असंख्य कोडी.....'

 अशा प्रकारे आपल्या हृदयीच्या अंत हृदयात पूर्णतः निमग्न होऊन त्यांच्या

कवितेतील भावविश्व उमलत जाते. भडक, स्थूल वा ढोबळ स्वरुपात या भाववि-

श्वाची अभिव्यक्ति त्या करीत नाहीत तर आत्म केंद्रित राहून आत्मनिष्ठा जपणारी

त्यांची कविता असूनही ती सूक्ष्म-तरल अनुभूतीची रूपे विविधतेने व्यक्त करणारी

भावमधुर कविता झाली आहे. प्रा. वा, ल, कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे इंदि-

राबाईंची ही कविता विशुद्ध भाव कविता आहे. हा भाव अर्थातच प्रेमाचा आहे.

हा प्रेमाविष्कार मात्र नाटकीपणा पासून, नकलीपणा पासून, तसाच सांकेतिक कल्प-

नांच्या प्रभावापासून अलिप्त आहे. पतीच्या चिरवियोगाचे दुःखयाच एका भावनेच्या

विविध छटांनी-बऱ्याचशा सूक्ष्म व अबोध अशा हया छटा आहेत-त्यांचे हे काव्यविश्व

ज्याप्त आहे हीच भावना प्रबळ आणि प्रभावी झाल्याचे त्यांच्या सहवास' नंतरच्या

बहुतेक सर्व काव्यसंग्रहांतून दृष्टोत्पतीस येते. या कारुण्याच्या छटा निसर्गातील

विविध प्रतिमाद्वारे व्यक्त होताना दिसतात. या कवितेत एक प्रकारची आर्तता,

हृदयाची स्पंदने व्यक्त होत असली तरी ती विलक्षण प्रत्ययकारी बनल्याचे आढळ-

ते. पतिविरहाच्याच एका भावनेने व्याप्त हे मन असल्यामुळे व्यथित मनोवस्थांचे

चित्रण त्यांच्या बहुसंख्य कवितांतून आढळेल. भावोत्कट - सुसंगत भावाभिव्यक्ति हा

त्यांच्या कवितेचा एक मननीय विशेष म्हणावा लागेल.


४०           आलेख