पान:आलेख.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे







सहा        इंदिरा संत आणि 'बाहुल्या



 इंदिरा संत (जन्म १९१४) यांनी आपल्या काव्यलेखनाने आधुनिक मराठी

काव्य-क्षेत्रात विशेष यश संपादन केले आहे. स्त्री कवयतींच्या मालिकेत इंदिरा

संतांचे स्थान फार वरच्या दर्जाचे आणि विशेष लक्षणीय आहे. सर्वच कवयत्रिच्या

मोजक्या आणि आटोपशीर लेखना प्रमाणेच इंदिरा संतांचे काव्यलेखन तसे आटोप-

शीरच आहे. कवयत्री म्हणून त्या प्रकाशांत आल्या. १९४० साली आपले पती,

ना. मा. संत यांच्या 'सहवास' मधून 'श्यामली' आणि 'कदली' हे दोन इंदिरा

संतांचे कथासंग्रही प्रसिद्ध आहेत. काव्यात्मता, भावनोत्कता, स्त्रीजीवनाची विविध

चित्रणे हे त्यांच्या कवितेतील विशेषच येथे ही आढळतात.

 पद्मा गोळे, संजीवनी मराठे, शांता शेळके या कवयित्रींच्या कविता पेक्षा

इंदिरा संतांच्या कवितेचे वेगळेपण सांगावयाचे झाल्यास त्यांची प्रतिमां प्रणय

संदर्भातील एका विशिष्ट अनुभूतीलाच तिच्या विविध परीसर साकार करण्यात

गढून गेलेली दिसते. अत्यंत तरल, सूक्ष्म आणि आगळ्या गहिराईने खुलणारे असे

त्यांच हे नाजुक भावविश्व आहे. आरंभीची संतांची कविता 'सहवास' या पतीच्या

कवितेसह प्रसिद्ध केलेल्या काव्यसंग्रहातून प्रसिद्ध झाली. एका तृप्त मनाने टिपलेली

ही प्रणयानुभूती सफलतेने साकार झाली आहे. प्रीतिभावनेचे सहज रम्य दर्शन तर

इथे घडतेच; पण या संग्रहातील त्यांच्या कविता मनोज्ञ आणि हृदयस्पर्शीही झाल्या

आहेत.

 पतीच्या निधनानंतर त्यांचे मृगजळ, शेला, मेंदी, रंगबावरी, 'बाहुल्या' असे काव्य..

संग्रह ठराविक अवधी ठेवून क्रमाने प्रसिद्ध झाले आहेत. पतिसहवासात. आपल्या
आलेख           ३९