पान:आलेख.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




असे त्यांना वाटते. तात्पर्य त्यांनी पुन्हा करुणा व दृढ़ता अर्जवासह. बुद्धविजय

झालेला आहे, यात जयोन्माद नाही हा निष्कर्ष काढलेला आहे.

 पु. ल.देशपांडे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' मधून प्रकाशित केलेल्या

'वंगचित्रात' जसे एके ठिकाणी सरस्वतीचे संपूर्ण मूर्ती स्वरूप अप्रतिमपणे स्पष्ट

करून दाखविले आहे . तसा नव-निमीण -क्षम-सर्जनशील असा हा दुर्गा भाग-

वतांचाही प्रयत्न आहे. वरील संदर्भात शेवटी एक रुढ संकेतही त्यांनी संभवनीयः.

मानला 'कदाचित बुद्धासारख्या सिद्ध तपस्व्यामुळे प्रसूती सुलभ होते' म्हणून ती

स्त्री तेथे दर्शविली असावी. यामुळे त्यांच्या 'इंटर-प्रिटेटीव्ह इमॅजिमेशला' थोडासा

धक्का निश्चितच पोहोचतो, असे म्हणता येईल.

 या पुढेही जाऊन त्या असे म्हणतात की, 'संमोह व संरक्षण या दोन परस्पर

विरोधी भावनांना या एकाच प्रतीकात समान स्थान दिले आहे.'

 चित्रोकृतीचे स्वकल्पनेनुसार त्यांनी केलेले हे परिशीलन (Appriceation)

असल्यामुळे आत्मनिष्ठ टोकेसारखीच एका सर्जनशील (Creative)प्रतिभावंताची

ही कलासमीक्षा आहे. त्यात स्वतःच्या व्यक्तीत्त्वाच्या स्पर्शाने लालित्यही अवतर-

लेले आहे. म्हणूनच हा एक ललित निबंध आहे, असे मान्य करूनही असे म्हणावेसे

वाटते की अजिठ्यातील या भित्तीचित्राच्या एकाच भागावर त्यांनी आपले लक्ष

अधिक केंद्रित केले (Concentration) आहे. अन्यथा 'बुद्धाभोवतीचा

स्वतःचे शीर कापलेला योद्धा ही बरेच सुचवून गेला असता.

 चित्र माध्यमाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर त्या स्त्रिया अशा खाली

बुद्धाच्या नजरेच्या टप्प्यात असू शकतील काय ? एकूण सर्वच अवतीभोवतीच्या

अनेक चित्राकृतींपासूनच ही ध्यानस्थ योगी बुद्धाची शांत, करूण व आनंदयुक्त

नजर अलिप्त आहे. अन्यथा समोरील स्त्रियाच काय पण जरा बुबळे सरकवून

आजूबाजूच्या कमनीय स्त्रियाही नजरेच्या टप्प्यात येणे अवघड नाही. ते चित्र

व्हार्टिकल आहे त्यापेक्षा हॉरिझंटल कल्पून अनेक लोभ-प्रलोभनातील मोहातील

अलिप्त बुद्ध असे असावे.

 एक ललित निबंध म्हणून आस्वाद घेत असताना चित्रातील आशायाबद्दल

व्यक्त होणाऱ्या मतांचा विचार अप्रस्तुत ठरतो. म्ह्णून लेखिकेची कलात्मक दृष्टी

समजावून घेणे अत्यावश्यक आहे.

 या संदर्भात एकाच गोष्टीचा उल्लेख सुद्धा पुरेसा होईल-कंथकासारख्या

निष्ठावंत गौतम बुद्धाच्या घोड्याने आपल्या जिवलग धन्यासाठी प्राण सोडला

याचे मोठे हृद्य, उत्कट भावपूर्ण आणि कलात्मक वर्णन दुर्गा भागवत करतात.

'एकमार्गी भावना पशूसारखी माणसाला आत्मसात करता येणे कठिणच !

आलेख         ३७