पान:आलेख.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





कधीच नसतो, तर तो असतो सौम्य व आजवी चेहन्याच्या माणसा सारखा !

देवावर विजय मिळविणारा हा मोह. सिद्धार्थापुढे हतबल झाला.. या चित्रातील

बारीक सारीक तपशीलाचेही यापुढे विस्ताराने वर्णन येते. या प्रत्येक चेहयाचा,

त्यावर उमटलेल्या भावांचा, त्यांच्या अनुभावांचा, प्रत्येक चित्रातील वस्तू-वस्तूंचा

अभिनयाचा विचार केला तर फार मोठा, अधिक व्यापक व सूक्ष्मही अर्थ या

Symbolic बनलेल्या संपूर्ण चित्राकृतीतून निघू शकेल. दुर्गा भागवत ग्रिफिथ्स.

च्याच आधाराने पुढे जाऊन सिद्धार्थाच्या खालच्या बाजूला असलेल्या दोन कन्यां-

बद्दल विस्ताराने आपल्या जाणीवा व्यक्त करून त्यांना चित्रातला उत्कर्षबिंदू

वाणितात. अनेकांच्या दृष्टीने अनेक असे उत्कर्षबिंदू ठरतील. एवढे आव्हान त्या

कलाकृतीत निश्चितच आहे.

 'माझ्या मते या संबंध चित्रांचा उत्कर्षबिंदू बोधिसत्त्वाची अधोन्मीलित,

स्थिर आतल्या आत बुडालेली नजर व या दोन स्त्रिया आहेत. बोधिसत्त्वाची खाली

वळलेली नजर जिथे नेमकी पडावी तिथेच या दोघीजणी आहेत. आणि म्हणूनच

त्याने आपली नजर तेथे पडू न देता आतल्या आत वळविली आहे.' असे सांगून

दुर्गाबाई भागवतांना या गर्भारशीचे आशा, भय व कामातुरता याचा परिणाम

चेहऱ्यावर रंगविणारे चित्र ' अद्वितीय वाटून बुद्धाला बोधी प्राप्त व्हावयाच्या

सुमारास नजरेच्या शेवटच्या टप्प्यावर क्षणभर तरी हे गभरिशीचे दृष्य रेंगाळत

रहावे हा कलासंकेत अति अपूर्व वाटतो.

 त्यांनी या चित्राचा नवनिर्माणक्षम (Crealive) प्रज्ञा–प्रतिभाजनित

फार चांगला अर्थ लावण्याचा प्रयत्न अनेक त-हेने केलेला आहे.

(१) मायादेवीने सिद्धार्थाला असाच उभ्या उभ्या जन्म दिला याचे बुद्धाला

स्मरण व्हावे म्हणून

(२). यशोधरेला मुलगा झाला तेव्हा 'हे बंधन जन्मल' त्या जाणीवेची

पुनरावृत्ती व्हावी म्हणून-

(३) आसन्नप्रसवा जगाच्या आदराला पात्र असते निदान हे तरी धानस्थ

होताना बुद्धाने लक्षात घ्यावे म्हणून-

(४) माराचा पराभव म्हणजे हिंपुटीपणा-मरगळलेली वासना : त्याचे

संसारी प्रतीक म्हणजे है जवळ येऊन ठेपलेले जनन-

(५) जणू काही जन्ममृत्यूचे चक्र पोटात घेऊन ती गभरिशी उभी आहे.

याची जाणीव व्हावी म्हणूनच ती निर्भय बुद्धमुद्रा अंतास्थित नगर होऊन या

वेदनेवर वैराग्योद्भवशांती हाच उपाय मानते हाच या . चित्राचा संदेश असावा

३५         आलेख