पान:आलेख.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




पाश्चात्य अभ्यासकांच्या भाषेत ("Temptation of the Buddha')

म्हणतात.

 अश्वघोषाच्या बुद्धचरिताच्या चवथ्या सगीत सुंदर आणि कामुकं रमणीसह

गौतम वनविहारासाठी गेला असता रमणींनी त्याच्या केलेल्या शृंगार चेष्टांचे

रसभरीत वर्णन येते. पण तरीही गौतम शांत आणि स्तब्धच होता. इतका की

एका युवतीला म्हणावेसे वाटले 'तं स्वस्थं चोदयन्तीव वचितो सी-त्येव क्षितः॥

(तुम्ही या सुखाला वंचित होत आहात) मला वाटते हाच तो 'मार विजय

असावा.

 अजिंठ्याच्या चित्रकलेतील बुद्धप्रलोभनाच्या भित्तीचित्राचा गौरवपूर्ण उल्लेख

करताना लेखिका म्हणते-'कलेतील सिद्धी लक्षात येण्यासाठी म्हणून या प्रसंगाचे

वाड्:मयीन व रंगाकृतीचे दर्शन एकाच दृष्टिक्षेपात घ्यायला हवे' पाली वाङ्मयातील

या चित्रप्रसंगाची रंगत अधिकच खुलवून बुद्ध व मार यांचा संवाद रंगविलेला

आहे. पालीभाषेतील रंगतदार कथेला जोडूनच 'महावस्तू' या पालीटीका वाङ-

मयापूर्वीच्या ग्रंथातील मोठे कल्पनारम्य, संवाद-माध्यमातील, लेखिकेने चित्रीत

केलेले बहारदार वर्णन येते. 'मार' प्रेम जाणतो तर 'बुद्ध' श्रेय तेवढेच जाणतो.

बुद्ध आणि मार यांच्यातील युद्ध चित्रित करणे हा या ललित निबंधाचा खरा

गाभा आहे असे म्हणावे लागेल. बुद्ध आणि मार यांच्यातील हे युद्ध प्रतिकात्मक

बनते. या दंतकथेला अतिमानवी रूप प्राप्त झाल्यामुळे ती मधील वस्तुनिष्ठाच

बळावलेली दिसते. अजिंठ्यात शिल्पाकृती व भित्तीचित्र असे दोन, भारतातील

आणि भारताबाहेरील 'बोरोबुदूर येथे एक असे एकूण तीन या संग्राम प्रसंगाचे

शिल्प रेखाटन आहे असे सांगून दुर्गा भागवत मुख्यत्वाने अजिंठ्याच्या रंगीत

भित्तीचित्रा बद्दल लिहितात. याचे कारण यात अनेक आकृती असून प्रत्येक मुद्रे-

वरील भाव फार चांगला अभिव्यक्त झालेला आहे. यासाठी 'जॉन गिमिथ्स' च्या

पुस्तकाचा आधार घेतलेला आहे.

 बुद्धाच्या शेजारी अनुनय करणारी कामी मारकन्या, धमकी देणारा खड्ग-

धारी योद्धा, भेडसावणारा राक्षस, मृत्यूचे प्रतीक असे त्याच्या डोक्यावरील घुबड,

व्याघ्रमुख राक्षस, अश्वमुखी किन्नर, क्रूरमुद्रा भयानक कानी, स्वतःचा गळा काप-

लेला योद्धा, याशिवाय अन्य कितीतरी भेडसावणारे चेहरे ही झाली या चित्रातल्या

डाव्या बाजूची नुसती मांडणी-तर उजव्या बाजूलाही असाच अनेक भाकृतींचा

मेळावा आहे. 'पुन्हा कमनीय तरुणी, गदा प्रहार सिद्ध योद्धा व अन्य कितीतरी !

पण त्यातला एक भात्यातला बाण संपलेला राजपुन ग्रिफिथ्स्च्या दृष्टीने हाच

मार असावा, बुद्धावर विजय न संपादन करू शकणारा ! मोह हा खलपुरुष

आलेख        ३५