पान:आलेख.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांच्यातल्या अबोल रहस्याची बोचणी लागावी लागते. यातूनच 'बुद्धाचे प्रलोभन'

या विचारभावगर्भ ललित निबंधाचा रुपबंध सिद्ध झालेला आहे.

 दुर्गा भागवतांच्या मनातील 'बुद्ध' या विषयाचे बिंबलेपण त्यानी बौद्ध मठ

जीवनावर आरंभी लिहिलेल्या प्रबंधावरून 'गौतम बुद्ध व स्त्रिया' या त्यांच्या

'पखरण' महाविद्यालय नियतकालिकातील लेखावरुन जाणवते.'बुद्ध प्रलोभन'

म्हणजे अजिंठ्यातील एका भित्तीचित्राची त्याच्या संदेशाची-त्याचा उत्कर्ष बिंदू

शोधण्याची कलात्मक चर्चा आहे. अजिंठ्यातील या चित्रात त्यांनी धर्मानुभव आणि

कलानुभव नुसते समान पातळीवर नव्हे, तर एका प्रतीकात एकरूप करुन टाकले

असल्याचे जाणवते
.

 'अजिंठ्यातील चित्राच्या पहिल्या श्रेणीत बुद्धाचा जन्म, त्याचे महाभि-

निष्क्रवन, 'मार विजय,' धर्मचक्रप्रवर्तन इ. चित्रांचा समावेश करावा लागतो.'

'बुद्ध प्रलोभन' ह्या ललित निबंधाचे पहिले वाक्य 'गौतम बुद्धाचे. जीवन शांत

तसेच चित्ररमणीय आहे' हे एक विधान आहे. त्यावर दुर्गा भागवत ललितम्य

भाष्य करतात. सन्याशी जीवन आणि रमणीयता म्हणजे वदतो-व्याघात !

कारण सन्यास धर्मात वासनांची मुळे मरतात, तिथं रसमय जीवनाची

फुले फळे कोकून बहरणार ! असें म्हणून 'सह्याद्रीकार' के. स. आ. जोगळेकरांना

'अति रसिक' या खोचक शब्दांत संबोधन पद्मपाणी बोधिसत्त्वावरील त्यांच्या

भाष्याबद्दल त्यांची 'विकेट' घेतात. त्यातून त्यांना सुचवायचे आहे की आमची

एकूण सन्याशाबद्दलची धारणाच चुकीची आहे. वैराग्य-पूर्तीतच साकार होणा-या

शांतरसावर मोठे कलात्मक भाष्य लेखिकेने केले आहे. शांतरस हा जीवनाचा

आधार असतो. जीवन व मरण त्यामुळे फिके पडतात. साखळीतील कड्यांप्रमाणे

एकातून दुसरा विचार त्या फुलावितात हे लेखनाचे महनीय वैशीष्टय इथे प्रत्ययास

येते. याच शांतपणाने बोधीसत्त्वाची चर्चा तयार होते. यानंतर एका रोकड्या

आणि नितांत सुरस अशा बोधिसत्त्वाच्या कथेकडे लेखिका मार्मिकपणे वळते.

अवघ्या या २९ वर्षाच्या या राजपुत्राने शांती-प्राप्तीसाठी घेतलेला विरक्तीचा

विशेषानुभव त्यांचा चिंतनविषय बनतो. 'मोठाले निश्चय असे झटपटच तयार

होतात' असे कलात्मक भाष्य या चिंतनातून साकारते. बुद्धाच्या सन्यास ग्रहणाच्या

वेळच्या मन:स्थितीच्या वर्णनातच या निबंधात महत्त्व प्राप्त झालेला 'प्रलोभक

मार-मोहविणारा जणू मन्मथच' अवतरतो. 'मार' ह्या पापपुरुषावर लेखिका

स्वतंत्र प्रकाश पाडते. मार हा संसारप्रतीक आणि संसार म्हणजे जन्ममृत्यूचा खेळ.

बौद्ध वाङ्मयात या माराला नमुची म्हटले आहे. पुराण-प्रसिद्ध नमुचीहून वेगळा!

बुद्ध या माराचा पराभव करून 'मारविजय' मिळवितो. यालाच बुद्धप्रलोभन-

३४         आलेख