पान:आलेख.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




पाच    दुर्गा भागवतांचे 'बुद्ध प्रलोभन'


 'पैस' मधील आणि एकंदरीत दुर्गा भागवतांचे लिखाण वाटते तेवढे गूढ

आणि दुर्बोध नाही. 'स्वच्छंद' मधील त्यांच्या भूमिकेवरून तरी निदान असे म्हणा-

यला हरकत नाही. मात्र या लेखनातील सांस्कृतिक आणि अन्य किती तरी संदर्भ

समजावून घेऊन त्यांच्या कलावंत मनाची जडण घडण काळजीपूर्वक लक्षात घेतली

पाहिजे. उत्कट' साहित्यातून जीवनोन्माद चाखलेले, भोवतीच्या राष्ट्रीय आंदो-

लनातील रुद्र करुणाचे 'न-भूतो न भविष्यति' असे नाट्य पाहिलेले, जगलेले,

सदैव निसर्गाच्या संथ लयीने घेरलेले असे हे भागवतांचे मन आहे. स्वच्छंदी तरीही

पायाशुद्ध लेखनाचा ध्यास या मनाला आहे. 'सजवून-शृंगारुन स्वतःची मनोमूर्ती

जनाच्या मानसमंदिरात स्थापन करण्याची क्रिया मला आकर्षक वाटत नाही ,

या त्यांच्या मतामुळेच त्यांचे लिखाण रुढ संकेतापासून विमुक्त झालेले दिसते.

त्यातं एकाच वेळो भावनिक आणि बौद्धिक आत्माविष्कार झालेला आढळतो. हे

लेखन म्हणजे चिंतनशीलता आणि लालित्यपूर्णता यांचे मनोज्ञ मीलन !

 त्यांच्या वाचनाची कथा बौद्धिक व ललित विषयात विस्तृत असल्याने एक

प्रकारची नि:पक्षपाती वैचारिक निष्ठा व बौद्धिक स्वातंत्र्य यांची प्रतिष्ठा मनात

आपोआप तयार झाली व त्याचा आविष्कार म्हणजेच हे ललित लेखन ! त्यांचे हे

ललित निबंध म्हणजे कल्पनाविचार, स्मृती व भाव यांचे उत्तम रसायन ! व्याव-

हारिकतेपासून अलिप्त राहून ललित लेखनाचा केवळ भावनेशी संबंध न मानता,

जीवनाशी घनिष्ठ संबंध मानणारी ही लेखिका आहे. त्यांच्या ललित लेखनात

भाववृत्ती आहे म्हणूनच त्याला सृजनाचा अंकुर फुटलेला दिसतो. ही भाववृत्ती

जागी होण्यासाठी प्रीती, मृत्यू, प्रत्यक्ष जीवन आणि सृष्टीचा विराट पसारा



आलेख

३३