पान:आलेख.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




कल्पना सोडून संसारस्वप्न पाहणाऱ्या सुदामचे मन खन्या मनाचे आणि समाजाचे

बोलके चित्रण होऊन बसते.
विशुद्ध विनोदनिमिती:

 सामान्य माणूस असामान्य बनण्याचा प्रयत्न करतो हीच मुळात मुख्य विसं-

गती असून तीवर कोल्हटकरांचे विनोदी लेखन निर्माण झालेले आहे. समाजातील

अशा समस्यांवर ते लिहितात की, ज्यांच्याशी सर्वाच्या भावभावना निगडित आहेत;

पण या लेखनात तडजोडीचा अवलंब केला आहे. 'निर्जळी एकादशी', 'चित्रगुप्ताचा

जमाखर्च' या लेखनातील उपहासाची धार पुढे कमी झाली. मानवी मनातील

विविध विसंगतीचे मनोज्ञदर्शन घडवून विशुद्ध विनोदाची निर्मिती त्यांनी केली.

प्रदर्शनात्मक प्रवृत्तीवर त्यांनी विडंबन केलेले आहे. त्यांच्या लेखनाच्या मुळाशी

अस्सल जाणिवा असल्यामुळे प्रतिमांच्या भाषेत विशुद्ध अभिनव विनोद ते निर्माण

करू शकले. खळखळून हसविण्यासाठी जे लिहितात ते फार सोपे बनतात. कोल्हट.

कर खळखळून हसवीत नाहीत; अंतर्मुख करत. त्यांच्या लेखनातून उपहासाबरोबर

अनेक संदर्भ, अर्थसूचक अनुभवही येतात. सखोल अनुभूती, मानवी मनातील मूल-

भूत नाटयाची जाणीव, माणसाच्या मनांचे विविध आकार इत्यादी गोष्टी कोल्हट-

करांजवळ आहेत. सबळ मानवी मन त्यांच्या लेखनाच्या मुळाशी आहे; म्हणून

'लग्नसमारंभ', 'चोरांचे संमेलन' चिरंतन ठरते. विवाह समारंभातील अनेकविध

निरर्थक चालीरीतीचे चित्र लग्नसमारंभात आहे. लग्नातील ज्या विधींचे आपण

काटेकोर पालन करतो त्याबद्दल केवढे अज्ञान आपले असते हे त्यांनी येथे दाखविले

तर 'चोरांचे संमेलन' हे कोणत्याही संमेलनाचे अथपासून इतिपर्यंत केलेले बेजोड

विडंबन आहे. त्यात बेतोड उपहास आहे. उपहासविषय बनलेल्या व्यक्तिबद्दलच्या

टवाळीची भावना येथे निर्माण होत नाही तर उलट त्यांच्याबद्दलची प्रगाढ सहानु-

भूतीच वाटू लागते ; कीव येते.

 आज काळ बदलला तरी कोल्हटकरांच्या 'सुदाम्याचे पोहें' मधील विनोद

उपहास वाचनीय, चिंतनीय काहे ; म्हणूनच तो विशुद्ध, चिरंतन ठरतो. त्याचे

महत्त्वाचे कारण नुसता विनोद उपहास येथे नाही तर या सर्वच लेखनात एक

तात्त्विकतेचा, वैचारिकतेचा पदर आहे अखंड धागा आहे. एका भक्कम सुधारणा-

वादी तत्त्वज्ञानावर आणि तत्त्वचिंतकाच्या चिंतनातून या विनोदाची निर्मिती झाली

आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, श्रीपादकृष्ण कोल्हटकरांचे सुदाम्माचे हे पोहे

चिररुचिर आहेत.


    (मनोरा ऑगष्ट, १९७७)

३२           आलेख