पान:आलेख.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




लेखांना सहज निबंधरुप मिळाले. 'शिमगा' हा उपहास-गर्भ लेखाचा आदर्श आहे.

उपहासाची सारी वैशिष्टये त्यात पहायला मिळतात. सामाजिक जाणिवांचे चित्रण

करताना संपूर्ण समाजाचे, गावाचे जीवनदर्शन कोल्हटकर घडवितात. अर्थपूर्ण

विनोदी लेखनासाठी समाज जीवनाशी, जाणिवांशी असा अनुबंध लेखकाला कला-

त्मक रीतीने निर्माण करावा लागतो. कोल्हटकरांच्या विनोदी लेखनात माणसे,

त्यांच्या भोवतीचा परिसर, समाज सारे जाणवते. त्यांच्या लेखांना लाभलेला हा

सामाजिक संदर्भ त्याच्या यशाचे रहस्य आहे. कोल्हटकर लिहीत गेले आणि त्यांच्या

व्यक्ती, व्यक्तींचा समाज जिवंत होत गेला. त्यात कृत्रिमतापूर्ण योजना नाही.

खुमासदार विडंबन:

 चि. वि. जोशींच्या प्रमाणेच कोल्हटकरांच्या विनोदी निबंधात अनेकदा

विषयांतर आढळते. काही वेळा ते निरर्थक वाटले तरी पुष्कळदा ते, या निबंधांना

ललित निबंधाचे रूप प्राप्त करून देणारे अर्थपूर्ण होते. लेखकाला जाणवलेल्या

वास्तवाशी सुसंगत, दर्शविलेली विसंगती जेव्हा असते त्या वेळेला ती यशस्वी

चित्रित होते. केवळ दास्यनिर्मितीसाठी ती टिपलेली नसावी. मूलभूत विसंगतीला

अतिशयोवत रूप देऊन ती यशस्वी अर्थपूर्ण बनते. नव्या संस्कृतीत वावरताना त्यांच्या

या व्यक्तींचा बावळटपणा, मूर्खपणाही प्रकट होतो. फसवा ताऱ्कीक मुखवटा चढवून

कोल्हटकर क्षुल्लक गोष्टींची गंभीरपणे चर्चा करतात. काटेकोर शब्दकळा आणि

सूक्ष्म विचारप्रवाहाची जाणीव येथे वाचकांना होते. साध्या विषयाचे तर्कनिष्ठ

विवेचन ते करीत असल्यामुळे त्यातील विसंगती अप्रतिम त्यांना साधते. नैतिकता

आणि भारतीय संस्कृतीचा संबंध जुळविणाऱ्या सनातनी मंडळींच्या प्रवृत्तीचे त्यांनी

मोठे खुमासदार आणि विस्तृत तपशीलवार विडंबन केले. आहे. सौंदर्याबद्दलच्या

स्वतःच्या काही कल्पनांतून गणेश चतुर्थी' या निबंधातील विसंगतीचा जन्म झालेला

आहे. आगरकरप्रणीत. बुद्धिवादातून देवाधर्माबद्दलचे विषेश आणि अन्य निरर्थक

गोष्टी यांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न अशा लेखनातून केला आहे. पण अशा

निबंधातून सामाजिक मनालां कोल्हटरांनी दुखविले. केवळ पावित्र्य विडंबनामुळे

नव्हे तर मानवी भावनेशी संबंध प्रस्थापित करू न शकल्यामुळे केवळ वरवरच्या

विसंगतीवर भर दिल्यामुळे 'गणेशचतुर्थी' हा निबंध सामान्य पातळीवर येतो.

'माझ्या भीष्मप्रतिज्ञेचा विजय' हा निबंध मात्र अप्रतिम आहे. या निबंधात चित्रित

झालेली रूढीतील विसंगती आज अस्तित्वात नाही. पण असे असूनही एव्हरग्रीन हा

निबंध म्हणता येईल. 'भीष्म प्रतिज्ञा' या शब्दालाच नवा अर्थ येथे प्राप्त होतो. या

कहाणीतील सुदामा साठ वर्षाचा म्हातारा आहे. पण अजूनही त्याची संसारलालसा

नष्ट न होता सुंदर तरूणीबरोबर विवाह करण्याची इच्छा आहे. मरणाची

आलेख

३१