पान:आलेख.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





बरोबरच मानवी मनाचेही चिंतन सतत कोल्हटकरांनी केलेले आहे. मूल्यांतील

विसंगतीबरोबरच मानवी मनाचीही विसंगती ते दाखवितात. म्हणून त्यांचा उप-

हास दर्जेदार, श्रेष्ठ ठरतो. सुसंगतीमधील विसंगती दाखवून पुन्हा विसंगतीतून

सुसंगतीची सूचना देणारा उपहास हा नेहमी श्रेष्ठ दजीचा ठरत असतो. या सुसं-

गतीचे सुस्पष्ट चित्र त्यांच्या मनी असे.

कोल्हटकरांचे 'मानस पुत्र'

 कोल्हटकरांचा 'सुदामा' प्रत्येक निर्बुद्ध, सामान्य गोष्टीचे उदात्तीकरण कर.

णारा आहे. तर 'बंडूनाना' 'पांडूतात्या' यांच्या रूपाने विविध मानवी प्रवृत्ती मूर्ति-

मान झाल्या आहेत. बंडूनाना श्रद्धाळू असून जुन्याचे प्रतिपालक ! प्रत्येक जुन्या--

गोष्टीत ते रस घेतात. व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनून बंडूनानचे 'कुलुपाचे'

वेड व्यक्त होते. ही गोष्ट अर्थपूर्ण असून 'प्रत्येक गोष्टीकडे संशयी वृत्तीने पाहणे',

हे सारेच सनातनी प्रवृत्तीचे प्रतीक बनते . पांडुतात्या हे ऐदी व अघळ पघळ

असून कोणत्याही गोष्टीबद्दलचे रसिकत्व त्यांच्या ठिकाणी आहे. पांडुतात्या शृंगा-

रिक प्रवृत्तीचे व उपयुक्ततावादी आहेत. सनातन्यांच्या सुखविलासी वृत्तीचे प्रतीक

म्हणून ते येतात. या व्यक्ती एक व्यक्ती म्हणून जिवंत होतात. त्यांना त्यांचे

स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लाभले आहे.

लेखनाला सामाजिक संदर्भ :

 जुन्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करू इच्छिणाऱ्यांचे वा नवे नवे प्रयोग कर-

णान्यांचे या लेखात आलेले चित्रण आणि त्यांच्या विविध प्रवृत्तींचे विडंबन

म्हणूनच मोठे खुमासदार उतरले आहे. या संदर्भात 'आमच्यातही एडिसन निर्माण

होतील' हा उपहास किंवा 'भारतीय कलेला उत्तेजन न देणारे चोर देशबुडवे' ही

तक्रार अर्थपूर्ण ठरते.

 बंडूनानांचे वर्णन अतिशयोक्त वाटत असले तरी ती अतिशयोक्ती त्यांच्या

व्यक्तिमत्वाच्या संदर्भात अर्थपूर्ण ठरते म्हणुनच कलात्मक बनते. कोल्हटकरांच्या

जवळ नव्या कलात्मक जाणिवा आहेत. मानवी जीवन आणि मनाशी-व्यक्ति-

मत्त्वांशी संबंध साधणारा, अपरिहार्य, बेमालूम नाते जुळविणारा हा विनोद आहे

म्हणून तो श्रेष्ठ ठरतो.

 'शिमगा' या लेखात तत्कालीन विद्वानांच्या व्याज विद्वतेने विडंबन केले.

निबंधकाराचे विडंबन करण्यासाठी त्यांचेच माध्यम स्वीकारावे लागले म्हणून या


३०         आलेख