पान:आलेख.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




लेखन भूमिकेतील बदल :

 'साक्षीदार' हा १९०२ साली त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला. हा लेख

त्यांच्या व्यवसायाशी संलग्न लेख असून त्यात त्यांनी सामान्य माणूस गृहीत धरला

आहे. साक्षीदाराच्या वर्तनकृतीशी त्याची तुलना त्यांनी केली आहे. हा एक गाज.

लेला लेख असूनही त्याचा समाजाशी फारसा संबंध नव्हता. 'शिमग्या' पासून

त्यांच्या विनोदी लेखनाचे खरे म्वरूप स्पष्ट होते. विनोदाचे आकलन आणि

आस्वाद घेण्याची सवय महाष्ट्राच्या अंगवळणी त्या वेळी पडावी तितकी, निदान

आजच्या सारखी तरी पडलेली नव्हती. तत्कालीन वाचकांच्या पचनी हे विनोदी

लेखन पडू शकले नाही. त्याचा परिणाम म्हणजे कोल्हटकरांचे या क्षेत्रातील श्रेष्ठ

स्थानही त्यांच्या लक्षात आले नाही. विपर्यस्त दृष्टिकोण वाचकांचा असला तरी

कोल्हटकरांनी या लेखनावरची पकंड कायम ठेवली. तथापि विद्धानांच्या पारं.

परिक, संकेतनिष्ठ विनोदी लेखन विषयक भूमिकेचा कोल्हटकरांच्यावर परिणाम

होऊन त्यांचा मूळ अवखळ पणा नंतर कायम राहिला नाही.

 विनोदी लेखनाचे फार मोठे लक्षण सूचकत्त्व आहे. या सूचकत्वाचा आढळ

कोल्हटकरांच्या लेखनात आहे तो प्रमुख गुण म्हणूनच ! त्यांच्या लेखनात ग्रांथिक

भाषा सहसा आढळत नाही, पण आढळल्यास पंडिती भाषेचे विडम्बन म्हणून ती

येते. उदाहरणार्थ, 'हजामतीची-नीति- मीसांसा' यातील 'हजामत' हा शब्द सूचक

आहे. क्षुल्लक गोष्टीचे उदात्तीकरण करण्याच्या सवंग पद्धतीचे विडम्बन यात

श्रीपादकृष्णांना अभिप्रेत आहे. शिवाय तत्कालीन लेखांच्या शीर्षकातील हास्या-

स्पदता त्यातून सूचित करावयाची होती असे दिसते.

विसंगतो तून सुसंगतीची सूचना :

कोल्हटकरांनी आरंभी समाजातील गंभीर विसंगतीवर लिहिले; पण

आपली वक्रोक्ती, श्लेषात्मकता लोकांना कळत नाही हे पाहून सुरुवातीचे चित्र

त्यांनी बदलले आणि पुन्हा एकादशी (निर्जळी), श्रावणी, शिमगा, गणेशचतुर्थी

यांसारखे तीन पातळी लाभणारे विनोदी निबंध लिहिले नाहीत. तिसऱ्या आवृ-

त्तीच्या प्रस्तावनेत हे दिसून येते. नाटकाच्या संदर्भात त्यांनी हेच केले. कल्पनारम्य

नाटकाकडे ते आकर्षिले गेले पण कठोर सामाजिक नाटक लिहिण्यासाठी आवश्यक

असलेले विलक्षण धैर्य त्यांच्याठायी आढळत नाही. तेव्हा सुरुवातीचे तीव्र जाणिवा

व्यक्त करण्याचे त्यांच्या लेखनातील सामर्थ्य विशिष्ट कालावधीनंतर अशक्य

होऊन ते आनुषंगिक उपहासाकडे वळताना दिसतात. अर्थात सामाजिक चिंतना-
आलेख        २९