पान:आलेख.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






चार    सुदामाचे रुचिर पोहे

 श्रीपादकृष्ण कोल्हाटकरांच्या 'सुदाम्याचे पोहे'तील विनोदी लेखांचा अभ्यास

अनेक दृष्टीने विनोदी लेखन परंपरेत महत्त्वाचा ठरतो. एखादा साहित्यप्रकार

(Form of Literature) विविध मार्गानी विकसित कसा होतो आणि

त्याला स्वत:चे खास रूप कसे गवसते हे सुदाम्याच्या पोह्यांतूनही पाहता येते.

विनोदी लेखांच्या संदर्भात आद्यत्वाचा मान मराठी साहित्यात कोल्हटकरांनाच

द्यावा लागतो. केवळ ऐतिहासिक महत्व या विनोदी लेखांना नाही तर 'विनोंदी

लेखन' या प्रकारालाच दर्जेदार पातळी त्यांनी प्राप्त करून दिली आहे.
कलात्मक विनोदी लेखन:

 कोल्हटकरांनी आपल्या नाटकातून तत्कालीन सामाजिक पद्धतींचा उपहास

करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. पण घटनांमधील अंगभूत विसंगती आणि

त्या संदर्भातील लेखकाच्या मनातील पडसाद नाटयातून एवढया यशस्वीपणे उमटणे

अवघड असते. नाटकात व्यक्तिगत प्रतिक्रियांना वस्तुनिष्ठ (objective) रूप

प्राप्त होणे अत्यावश्यकच असते. कोल्हटकरांना केवळ सामाजिक विसंगती नाट-

कातून दाखवावयाची नव्हती तर या विसंगती इतकेच महत्वाचे असे स्वतःचे

भाष्य त्यावर त्यांना करावयाचे होते. नाटकातून हे साधणे त्यांना मुष्किल होते

म्हणूनच सुदाम्याच्या पोह्यांतून कमालीच्या कलात्मकतेने श्रीपादकृष्णांनी हे

अभिव्यक्त केले. दर्जेदार कलात्मक विनोदी लेखन म्हणून सुदाम्याचे पोहे रुचिरत्

पावले आहत.

२८

आलेख