पान:आलेख.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 (१) केशवपनाचे तोटे सांगणे हे 'पण लक्षांत कोण घेतो' चे प्रयोजन (जसे

संभ्रमीत अवस्थेचे तोटे है ‘हॅम्लेट'चे प्रयोजन)

 (२) एखाद्या कजाग सासुसासन्या च्या तडाख्यात सापडलेली अबला स्त्री हा

विचार म्हणजे कल्पकता वा योजकता

 (३) या प्रयोजनांच्या सिद्धीसाठी निर्माण केलेली कांदबरीलील घटनांची

साखळी म्हणजे करण.

 (४) यमू, शंकरमामंजी इ. व्यक्ती व त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेल्या

भाववृत्ती म्हणजे उपादान कारण या उदाहरणात करण आणि उपादान कारण

यात त्यांनी गल्लत केलेली दिसते. वस्तुत: दौत लेखणी ही साधनेच करण व्हायला

हवीत पण 'करण' ची व्याख्या त्यांनी पुरेशो स्पष्ट केली नाही. शब्द घटना

मालिका, व्यक्तींचे भाव ही उपादान कारणे ठरतील. शिवाय व्यक्ती घटना, आणि

भाव यांचा कोल्हटकर जसा छेद देऊन विचार करतात तसा करता येत नाही.

याचा अर्थ या घटकातील सेंद्रिय नाते त्यांनी लक्षात घेतले नाही. कलाकृती विश्ले-

षणासाठी वस्तु. विश्लेषणाच्या तर्कशास्त्राचा अवलंब करता येत नाही. ललित

लेखनाचा शास्त्र बनविण्याचा प्रयत्न केला की त्यांत कळत न कळत कलेला गौण

स्थान मिळून कारागिरीलाच महत्त्वाचे स्थान मिळते. त्या विधानाची सत्यता पटते.

मध्यवर्ती, कल्पना, प्रयोजन, घटना, व्यक्ती यांचे संबंध कलाकृती रुपातच लक्षात

घेतल्याविना कलाकृतीचे नीट आकलन होऊ शकत नाही.. साध्य साधन-

भाव येथे आपणास कल्पिता येत नाही म्हणून श्रीपादकृष्ण कोल्हाटकरांचे है तर्क

शास्त्र, हा वाङ्मय विचार श्रेष्ठ दर्जाच्या कलाकृतीच्या आकलनाला थिटा पडू

लागतो. मात्र प्राध्यापक वा. ल. कुलकर्णी यांनी म्हटल्या प्रमाणे कोल्हटकरांच्या

वाङ्मयीन भूमिकेचा विचार करतांना त्यांचे वाङ्मयीन प्रश्नांचे विवेचन हे खास

त्यांचे असते. कोणताही प्रश्न येवो त्याचा अत्यंत साक्षेपाने, अभ्यासू वृत्तीने व

तपशील वारपणे परामर्ष घ्यावयाचा अशीच कोल्हटकरांनी आपल्या मनाला सवय

लावली होती.' त्यांचा कोणताही समीक्षा लेख चाळला तरी याचे प्रत्यंतर

आल्यावाचून रहात नाही.
       XXX .

आलेख

२७