पान:आलेख.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 खांडेकरांचा 'ययाती' हा तर फार मोठा संदेश देऊन जाते, तो नुसता कामी

'ययाती' नाही तर सर्व प्रलोभनांवरच संयमाचा लगाम घालण्याची आवश्यकता

सुचवितो. ययाती. यती कच शर्मिष्ठा देवयानी-पुरु-मंदार या सगळ्याच व्यक्तिरेखा

खांडेकर आपल्या कथेत नव्याने जिवंत करतात. त्यांना नवे अर्थ प्राप्त करून

देतात. आणि त्या आधाराने मानवी जीवनाचा नवा अर्थ कलात्मकतेची बुज राखून

उलगडून दाखवितात म्हणून एकूण मराठी साहित्यात खांडेकरांच्या 'ययाती'

कादंबरीचे यश अभूतपूर्व आहे. पौराणिक कादंबरीचे नवे पर्व आणि परंपरा निर्माण

करणारे आहे. मृत्युंजय, राधेय तर शिवाजी सावंत व रणजित देसाई यांनी केलेली

कर्ण कथेची विविध विकसने आहेत. कर्ण कथा या साहित्यिकांची अनुभूती बनली.

नव्याने अर्थपूर्ण होवून या कादंब-यातून व्यक्त झाली. कर्णातील 'माणूस' शोधण्याची

त्याला नवेव्यक्तिमत्व प्राप्त करून देण्याची कुवत त्यात आहे. रणजित देसाई राधेय

मध्ये कर्णाच्या पोरकेपणाची तीव्र जाणीव आणि त्याच्या एकाकीपणाची व्यथा

समर्थपणे, हळूवारपणे टिपतात. म्हणूनच 'राधेय' काव्यात्म व भावपूर्ण कादंबरी

झाली आहे. हृदयस्पर्शी बनली आहे. यावरून मराठी पौराणिक कादंबरी 'पलायन-

वादी' नाही. हे ही पटू शकते.

xxx
















२४

आलेख