पान:आलेख.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 भोवतालच्या सांस्कृतिक वातावरणातून आपण पुराण कथा आत्मसात करण्याचा

प्रयत्न करतो. म्हणूनच 'जनचि' संवाद साधलेल्या या पुराण कथांवर ललित लेखन

करणे एका दृष्टिने सोपे असते. मुळातच या पुराण कथा इतिहासासारख्या 'शुष्क

नसतात. तर त्या रमणीय 'रंभे ' सारख्या असतात; कारण पुराणे, महाकाव्येही

प्रतिभावंत मनांचाच अविष्कार असतो. सर्जनाच्या आड यणारी पुराणकथेत

इतिहासाच्या मानाने काहीच नसते. साहित्यात आपण जे प्रत्ययकारीत्व अपेक्षितो

मुळातच पौराणिकात समाविष्ट असते.

 भा.द. खेर, प्र. न. जोशी, आनंद साधले यांच्या सारखे लेखक आज पुराण

प्रियतेचा आस्वाद्यमानतेचा लाभ आपल्या बाणभट्टाच्या कादंबरी' रुपातीले

लेखनाने किंवा आरंभीच्या वामनशास्त्री इस्लामपूरांसारख्याच आजही उठवित

आहेत. या लेखनात जेथे पुराणनिष्ठा बाळगून परंपरा सांभाळली जाते. त्याचे श्रेय

एकिकडे मिळते तर दुसरीकडे कालविसंगत अधुनिकी करण्याच्या दोषाकडे चक्क

डोळेझाक करून अपेक्षितांच्या अंतरंगावर प्रकाश टाकल्याचे आणि व्यक्तींना

न्याय मिळवून दिल्याचे श्रेयही पदरात पाडून घेता येते.

 पौराणिक कादंबऱ्यात प्रामुख्याने एखाद्या व्यक्तिला केंद्र कल्पून चरित

कहानी शैलिदार ढंगात सांगितली जाते. आपले श्रद्धास्थान असलेल्या कथा

नायकाच्या व्यक्तीच्या भोवतीच कथेचे सूत्र गुंफले जाते. व्यक्तींच अंतिमतः मनात

ठसतात म्हणून हे 'व्यक्ति प्राधान्य' मनाला पटू शकते. मात्र चरित्रात्मक कादंबरी

म्हणून या कादंबऱ्यांचे मूल्यमापन करता येत नाही. पौराणिकाची सर्व समावेशक-

ताच याला कारणीभूत आहे. नवे चिंतन, प्रसंग, निर्मिती, पूरक कल्पीत व्यक्तिरेखा,

घटनांचा तपशील, रसनिर्मिती, स्वतंत्रकल्पकता इत्यादी गोष्टींना पुरेपूर अवसर

असतो.

 साहित्याच्या क्षेत्रात वाचकाला आणि लेखकालाही प्रत्येकवेळी रूचीपालट

हवा असतो. पौराणिक कादंबरी हा असाच एक रूचीपालट आहे असे म्हणता

येईल म्हटले तर मानवी स्वभाव आणि जीवन सदा सर्वकाळ तीच असते.

त्यातूनच पौराणिकतेची ओढ कायम रहाते. ज्ञात इतिहासाच्याही पूर्वीच्या, वारसा हक्काने

लाभलेल्या या संस्कृती संचिताचे, ठेव्याचे विशिष्ठ वास्तव आत्मसात करून झालेली

निर्मिती निश्चितच स्वागतार्ह आहे. पौराणिक साहित्यात स्वतंत्र प्रतिपादन येथेही

स्वाभाविकच आहे. कारण ते पौराणिक साहित्य आहे. पुराणांचे पुनर्मुद्रण नाही,

पुराणकथेलाच 'मीथ' हा पर्यायी शब्द आहे. 'मीथ' जेव्हा कलावंताच्या अनुभवाचा

भाग बनते तेव्हाच खरे पौराणिक साहित्य जन्मते . ययाति, मृत्युंजय, राधेय

अग्निकन्या, ज्वलंत इ. पौराणिक कादंबऱ्यांना या दृष्टीने महत्त्व आहे.

आलेख

२३