पान:आलेख.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




तीन   कोल्हटकरांची वाङ्मयीन भूमिका : एक विचार




 श्रीपादकृष्णांची वाङ्मयौन भूमिका त्यांच्या अनेक लेखांतून, विशेषतः ग्रंथ

परीक्षणात्मक लेखातून विखुरलेल्या स्वरूपात आढळते. समीक्षा लेखन करतांना

किंवा विविध वाङ्मय प्रकारातील साहित्यकृतींचा विचार करतांना जे प्रश्न

निर्माण होतात त्या निमित्ताने जे चितन केले जाते त्यातूनच समीक्षकांच्या वाङ-

मयीन भूमिका साकार व्हायला लागतात. कोल्हटकरांनी प्रारंभी ललित आणि

ललिते तर वाङ्मयाच्या सीमारेषा निश्चित करण्याचा प्रयत्न केला. 'मराठी कथा-

त्मक वाङ्मय, यालाच ते (१) सुभाषित वाङ्मय (२) शास्त्रीय वाङ्मय म्हण-

तात. त्यांचे अनुक्रमे वाचकांच्या चित्तावर विशेष ग्रह करण्याचे व जिज्ञासा तृप्त

करण्याचे कार्य त्यांनी सांगितले आहे. शास्त्रीय वाङ्मयात वस्तूंचे गुणधर्म सांगितले

जातात, तर त्याचे स्वरुप ललित वाङ्मयात सांगितले जाते. मात्र त्या वस्तूचे

रूप कशा प्रकारे साकार होते हा प्रश्न कोल्हाटकर निर्माण करीत नाहीत. त्यामुळे

महत्त्वाचे विवेचन राहून जाते. त्यांच्या 'टीकात्मक लेखनाचा मेरुमणी' ठरणाऱ्या

'तोतयाचे बंड' वरील टीका लेखात प्रारंभीच कोल्हटकरांनी आपली तात्त्विक

भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी काव्यात्मक व काव्येतर वाङ्मय असे शब्द

वापरुन विवेचन केले आहे.

 'अॅरिस्टॉटल'च्या प्रभावातून कलाकृती ही निसर्गाच्या ! अनुकरणातून

जन्माला येते काय ? त्यांचे परस्पर संबंध कसे असावेत, या महत्वाच्या प्रश्नांयच् ा

अनुषंगाने कोल्हटकरांनी विवेचन केले आहे. त्यांचा हा विचार साहित्य समीक्षेच्या

विकासातील एक महत्वाचा टप्पा मानावा लागतो. 'माधव निधन' नामक नाटका-


आलेख      {{gap}

२५