पान:आलेख.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




सूचित होतो. लेखकांच्या आत्माविष्काराची साधने या पौराणिक व्यक्ती बनतात.

उदा. 'अग्निकन्या' कादंबरीतील द्रौपदी म्हणते, 'स्वयंवर प्रसंगी अर्जुनाच्या अनुप-

स्थितीने आधीच मी व्याकुळ झाले होते आणि कर्ण उठताच माझा संताप अनावर

झाला म्हणून मी कर्णाचा अपमान केला.'

 पौराणिक कादंबरीकाराची 'पुराणकथा' हीच सामग्री असते. त्यातून उद्भ-

'वणाऱ्या शंकांच्या इतिहासासारखा वाद घालता येत नाही म्हणून या कादंबरीत

निवेदन पद्धतीला (Art of Presentation ला) विशेष महत्त्व येते. पुनर्मथ-

ना बरोबरच पुनरंचनाही येथे होते. पौराणिक कादंबरी मध्ये निवेदन पात्रमुखी

पद्धतीचा 'ययाती' कादंबरीचा पायंडाच रूजला आहे. सर्रास सर्वानीच या पद्धतीचा

अवलंब केला आहे.

 परंपरावादी पोथीनिष्ठ पुराणाला इतिहासर सारखे जपतात. त्यांना कलाकृती

समजून घेता येत नाही. त्यातुनच प्राचर्य आठवले, डॉ. वाळिंबे यांच्या सारखे

भाष्यकार उदात्ताचे अनुदात्त अनुदात्ताचे उदात्त दर्शन पौराणिक कादंबरीकार

चित्रित करीत असल्याची तक्रार करतात. व्यक्तीचे उदात्तीकरण हेही वस्तुतः

तिच्या चारित्र्यहनना इतकेच आक्षेपार्ह असते तेथेही पुराणाला डावललेले असते.

पण वाचक सुखावलंपणाने तक्रार करीत नाहीत.

 म्हणूनच हजारो वर्षापूर्वीच्या या पुराणकथांना संभवनीय करण्याचा प्रयत्न

हस्यास्पद ठरतो. ऋषीमुनींच्या अलौकिक प्रतिभेचा हा आविष्कार, लौकिक दृष्टीने

अभ्यासणाऱ्या , कादंबरीकाराच्या हातून हेच घडले आहे . अग्निकन्या' है अद्भूत

नाव धारण केलेल्या कादंबरीला अद्भुत नाकारलेले असून तेथे द्रौपदीला 'अनाथ'

केले आहे. येथे वास्तववाद कुचकामी ठरतो. वस्तुतः पौराणिकाचे आगळे वास्तव

गृहीत धरण भाग असते तसेच पौराणिक व्यक्ती वा प्रसंगांना रुपक म्हणून वा प्रतिक

म्हणून योजण्यात विशिष्ठ समिकरणे मांडली जातात त्यामुळे पौराणिक व्यक्तीच्या

गाभ्याला कथेच्या वास्तवाला स्पर्श करण्याचे सामर्थ्य लोप पावते. मग तेथे

पौराणिकतेचा वापर होतो. पौराणिक व्यक्ती आणि कथा स्वतःच्या हेतूसाठी

राबविली जातात.

 आजच्या काळाचे एक 'सांस्कृतिक वर्तमान' म्हणून आपण पुराण कथांकडे

पाहत असतो. आजही प्रमाण मानली जाणारी मूल्ये त्यात आपलयाला शोधता

येतात, आणि गवतातही सांस्कृतिक भावनिक आणि मूल्यात्मक पातळी वरूनच

आपण महाभारतासारखी पुराणकथा स्विकारतो. आपल्याला वर्तमान जीवनाचा

एक अविभाज्य भाग म्हणूनच आपल्याला हे सारे स्वीकारार्ह असते.
२२

आलेख.