पान:आलेख.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




दिसून येतोच! आपणच न्याय मिळवून देणारे असेही या लेखनातून सूचित झाले

आहे.

 'ययाती' मागोमाग 'मृत्युंजय' 'राधेय' कादंबऱ्या विषेश गाजत आहेत. कर्णा-

नंतर माता कादंबरीकार 'पांचाली'कडे वळले आहेत. पांचाली, अग्निकन्या, अग्नि-

सुता, या कादंबऱ्या अलिकडेच सुमती क्षेत्रमाडे, प्र. न. जोशी सुनेन्ना देशपांडे,

मोरेश्वर पटवर्धन, यांनी लिहिल्या आहेत. पण कर्ण विषयक लेखनात जो जोम आणि,

उभारी जाणवते, ती जिद्द कष्टाळू वृत्ती येथे आढळत नाही. त्याच प्रमाणे अश्वत्था-

म्याच्या जीवनावर 'तन्मयच्या दिवाळी अंकांत चि. ज. बोरकरांनी लिहिलेली

कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. आता महाभारतातील भीष्म एकलव्य, अश्वत्थामा,

युधिष्ठिर, कुंती, गांधारी, विदूर चिंतनाचे विषय होतील. अनेक अपशित कथोप-

कथांकडेही लक्ष वेधले जाईल एवढा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण जनरुची

संवाद साधणाऱ्या विषयावर 'कल्पवृक्ष', 'सारथी सर्वांचा' या सारख्या कथनपर,

चरित्रात्मक कादंबऱ्या भा. द. खेरांनी लिहिल्या आहेत. गो. नि. दांडेकरांची

श्रीकृष्णायन, अजुनि जागे नाही गोकुळ, आनंद साधले यांच्या सोन्याची. पाने,

योजनेतील मालविका, उर्वशो, कुमारसंभव, शाकुंतल या विदग्ध संस्कृत साहित्य

कृतीवर आधारीत कादंबऱ्या, विमल लेले यांची स्वप्न वासवदता, अनामिकाची

'एकवचनी एकबाजो' आणि सुमती क्षेत्रमाडे यांची 'मैथिली' या कादंबऱ्या . याच

वळणाच्या आहेत. एवढे मात्न खरे की, महाभारता सारखे आवाहन रामायण या

आर्य महाकाव्याचे जाणवत नाही कारण रामायणात व्यक्तिगत जीवनाचे आदर्श

आहेत. उत्कर्ष चिन्ने आहेत तर महाभारतात समूह मनाचा अविष्कार आहे .

एकाच वेळी इहतत्त्व आणि परतत्त्वाच्या पातळीवरील गुणधर्म झालेल्या व्यक्तिरेखा

आहेत. त्यामुळे महाभारताचे आकर्षण अधिकच वाटत रहाणार हे येथे स्पष्ट होते.

राजा राजवाडे यांना मात्र महाभारतातील 'भीमा' तच विशेषत्वाने मानवीपणाचा

साक्षात्कार झाला आहे. हा ज्याचा त्याच्या भावनेचा, जाणिवेचा प्रश्न आहे.

रणजित देसाई म्हणतात त्या प्रणाणे महाभारतापेक्षा आपल्या मनाची पाने हे

जाणून घेण्यासाठी उलटावी लागतात.

 वा. म. जोशी यांची 'आश्रम हरिणी' किंवा सानेगुरुजींची 'आस्तिक' या

कादंबऱ्याही याच पौराणिकतेच्या वळणाला प्रकट करतात. तर क्रौंचवध, शाकुंतल,

प्रमद्वरा, कवचकुंडले, ही कादंबऱ्याची शीर्षके पौराणिक, प्रतिकात्मक आहेत.

पौराणिक रूपके ही कादंबऱ्यातून योजिली. कादंबऱ्यांच्या या स्वरूपावरून काही

ठळक गोष्टी नजरेत भरतात.

 कादंबरी मुळातच 'फिक्शन' आहे. काल्पनिक प्रतिसृष्टी आहे. या पौराणिक

कादंबऱ्यातून पौराणिक सृष्टीचा वास्तव सृष्टीशी एक विशेष जिव्हाळयाचा संबंध


आलेख

२१