पान:आलेख.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




बापट, राजा राजवाड. इत्यादी साहित्यिकांनी अलिकडेच पौराणिक कादंबऱ्याा

लिहिल्या आहेत. (पौराणिकाचा आधार जसा या लेखकांच्या कादंबऱ्यांना आहेा

तसाच तो त्यांच्या नावाला उजाळा मिळण्यासाठीही लाभलेला आहे हे कोणी नाक-ा

बूल करू नये.)

 स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठी पौराणिक कादंबरीचे नवे युग

निर्माण करण्याचे श्रेय निःसंशय 'ययाति' कादंबरीचे आहे.

 अर्थात वि. स. खानडेकरांच्या 'ययाती कादंबरीच्या पूर्वीच कच देवयानीा

उपाख्यानावर आधारीत 'कलंकरहस्य' नावाची कांदबरी श्री.म. वर्दे यांनी लिहिलीा

आहे. १९२९ मध्ये या कादबरीची दुसरी आवृत्ती निघालेली आहे. या नवनिर्माणक्षमा

आणि काव्यानुकूल उपाख्यानाकडे संस्कृत साहित्यिकांचेही नाटय-साहित्य निर्मिती-ा

साठी लक्ष वेधले नाही पण खांडेकरांनी मात्र अचूकपणे या उपाख्यानाची साहित्या-ा

नुकूलता हेरली, 'किनारा' संग्रहातील कुसुमाग्रजांच्या 'उषा स्वप्न' कविते विषयीा

लिहितांना खांडेकर जे श्रेय त्यांना देतात तेच श्रेय येथे खांडेकरांचे आहे. मराठीा

प्रतिभेचे सामर्थ्य आणि आगळेपण येथे स्पष्ट होते.

 याचा एक सुपरिणाम म्हणजे प्रतिभावंतांच्याही प्रतिभेला आवाहन करण्याचेा

महाभारताचे सामर्थ्य पुन्हा एकदा नव्याने मराठी साहित्यिकांना जाणवले. १९६२ा

साली दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व', १९६७ साली इरावती कर्वे यांचे 'युगांत' आणि-ा

शं.के. पेंडसे यांचे 'महाभारतातील व्यक्ति दर्शन' ही वैफल्याने चचिली गेलेला

ललित गद्यात्मक पुस्तकेही कदाचित या गोष्टीला कारणीभूत असू शकतील कारणा

त्यातूनच महाभारतातील व्यक्तिची पारदर्शकता सूचित केली गेली. महाभारतकालीना

लोकसंस्कृती, समाज, घटना प्रसंग यांचे काळेपण कलात्मकतेने आणि लक्षवेधीा

तन्व्हेने विशद केले. याच सुमाराला कर्णावरील कादंबऱ्या लिहिल्या गेल्या श्रीकर्णा-ा

यन', 'मृत्युंजय', 'महापुरूष', 'राधेय!

 महाभारतातील अन्य सर्व व्यक्तिखेरीज 'कर्णी वरच कादंबरीचे लक्ष काा

केन्द्रित झाले? हा एक प्रश्नच आहे. पण यांचे उत्तर गवसते. कर्ण ट्रॅजिक हिरोा

आहे. कर्णाच्या जीवनात नियतीने मांडलेला जीवघेणा खेळ आहे. कर्णाची करूणा

कहाणीच त्याच्या विषयी अनुकम्पा निर्माण करते. त्याच्या जीवनात सांगण्यासारखेा

पुष्कळ आहे. पुष्कळ अद्भूत रम्यताही आहे. कर्णजन्म रहस्य, गुरूनिष्ठा, मित्रप्रेम,ा

विद्यासंपादन, कवच कुंडलांचे वरदान आणि या वरदानाचे पुन्हा दान, भावांशीचा

सामना, कर्ण-कुंती भेट,कर्णाची उपेक्षा, शापित जीवन आणि या जीवनाची अखेर हेा

सारे कर्णमय करणारेच आहे. उपेक्षितांचा कैवार घेणरा मराठी बाणाही येथे.
२० साचा:Rightआलेख