पान:आलेख.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे







दोन  मराठी पौराणिक कादंबरी : एक दृष्टिक्षेप.

 सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक या प्रमाणेच एक पौराणिकांचेही जग

मराठी ललित साहित्यात अस्तित्वात आहे. या पौराणिक जगताचे लेखकांना आणि

रसिकांनाही सहज कुतूहल आणि आकर्षण वाटत आलेले आहे.

 मराठी पौरणिक कादंबरी वाङमयकडे दृष्टिक्षेप टाकला तर हे लक्षात येते

की १८५० ते १९५० या अर्वाचीन साहित्याच्या पहिल्या शतकात एकही नाव

घेण्याजोगी वा विशेष गाजलेली पौराणिक कादंबरी आढळत नाही. १८८९ मधील

वामनशास्त्री इस्लामपूरकरांच्या 'करूण-राघव', 'विदग्ध पुरुखा' या संस्कृत ग्रंथा-

वरून तयार केलेल्या संवादात्मक (संवादाला प्राधान्य असलेल्या) कादंब-यांपासून

तर अगदी अलिकडे ऑगस्ट १९७८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या राजा राजवाडे यांच्या

भीमावरील 'ज्वलंत' कादंबरीचा विचार केला तर मात्र पौराणिक कादंबरीतील

सातत्य लक्षात आल्या शिवाय रहात नाही. पण मराठी कादंबरीच्या १५० वर्षाच्या

वाटचालीचा विचार केला तर पन्नासच्या जवळपासच पौराणिक कादंबऱ्यांची

संख्या मोठ्या मिनतवारीने भरते.

 भाऊसाहेब खांडेकरांच्या 'ययाति' कादंबरीच्या अपूर्व यशानंतर म्हणजे

१९५९ नंतरच स्वातंत्र्योत्तर कालखंडात पौराणिक कादंबरीचे दालन खऱ्या अर्थाने

समृद्ध झालेले दिसते. १९५९ पासून १९७८ पर्यंतच्या कालखंडात नुसत्या ३०.

कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. यातील बहुतेक लेखकांची नावेही कादंबरीकार

म्हणून आपल्याला फारशी परीचयाची नाहीत. शिवाजी सावंत, आनंद साधले, प्र.

न. जोशी मोरेश्वर पटवर्धन, विमल लेले, सुनेत्रा देशपांडे, वि. ज. बोरकर, दिवाकर


आलेख

१९