पान:आलेख.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




करणं आता तुम्हाला क्रमप्राप्त आहे! 'सामान्यांच्या नीतीच्या सापळ्यात आपल्या

सारख्यांनी का अडकून पडावं?'

 निरुत्तर करणारी ही प्रश्न मालिका आहे. शेवटी विषप्राशन करून चित्रलेखा

आत्मसमर्पण करते. ययातीचे खाडकन डोळे उघडावेत असेच हे आत्मसमर्पण आहे.

या घटनेची एक नवी संगती म्हणजे कर्नाडांच्या 'ययाती' नाटकाचा प्राण आहे. येथे

एक नवा आशय कलात्मक पातळी वरून अभिव्यक्त झाला आहे. महाभारतातील

ययाती उपाख्यानाचा नवा समर्थ आविष्कार करणारे कर्नाड यांचे 'ययाति' नाटक

म्हणूनच रसिकांचे लक्ष वेधून घेते.

X X X























१८

आलेख