पान:आलेख.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




स्वीकारण्यासाठी प्रजाजनात स्पर्धा लागेल अशी त्याची गोड गैरसमजूत आहे. शमि-

ष्ठा त्याला वानप्रस्थाश्रमाचा सल्ला देते पण त्याला ते पटत नाही. पुरू प्रजाजनांची

मनोभूमिका विशद करतो. सापासारखी कात टाकलेल्या उमद्या मनाच्या पुरूच्या

मिस्किलपणाची जाणीव' या नाटकात जागोजाग' होते. स्वप्न जपणारा ययाती

त्याच्या या जीवघेण्या मिस्किलपणाने विव्हल होतो. शेवटी पुरूच हे वार्धक्य स्वी.

कारायला तयार आहे, शर्मिष्ठा पुरूला समज देते. 'कारणाशिवाय बलिदान करण

हे मानसिक विकृतीचं लक्षण आहे. त्यागाचा अभिमान हे विष आहे.' चित्रलेखेच्या

आठवणीने त्यालावेदना होतात. चित्रलेखाच नाटकाच्या अखेरी केन्द्रबनते. देवया-

नीच्या मंगळसूत्रातील मणी या नववधूच्या हाती येतो. 'थोपवून धरलेल्या अश्रु इतक

भेसूर दुःख कोणतही असू शकत नाही.' असे म्हणणा-या चित्र लेखेला स्वर्णलता.

'पुरूने वार्धक्य स्वीकारल्याची वार्ता सांगते. पुरूच्या पौरूषाचा प्रत्यय येथे

अनुभवण्या इतकी चित्रलेखा समंजस आहे.

 तिला त्याच्या त्यागात साक्षात्कार होतो. या नंतर कर्नाड यांनी चित्रलेखा

व पुरूची थरारक भेट वर्णन केली आहे. चित्रलेखा ओवाळतांना पुरुचे वार्धक्य

पाहून भेदरते, त्याचा धिक्कार करते. तिला हे सारे असहय होते. त्यावर फुकर

घालण्यासाठी स्वर्गलतेची करुण कहाणी येते. शेवटी ययाती चित्रलेखेची जुगल

बंदी जुंपते. आपल्या पापाच गाठोडं पुरुच्या माथी मारून उपदेश करीत सुटणाऱ्या

ययातीचे सारे बिंग ती बाहेर काढते. येथे पराकोटीचा तीव्र, धारदार संघर्ष होतो.

विचारांच्या आच्छादनाखाली तरूण रक्तातली इर्षा नित्वेष दडविणारी ही चित्र-

लेखा नाही. ती सासऱ्यालाच जाब विचारते. मानवी जीवन हृदयाच्या ठोक्यां-

बरोबर साथ करते घडयाळाच्या वा काळाच्या नव्हे ! तिला यौवनातला क्षण न

क्षण मोलाचा वाटतो. ययाती मात्र प्रजेच्या कल्याणात आणि काममोहात गढलेला

आहे. तो चित्रलेखेला असामान्य होण्याचा सल्ला देतो. पण ते त्यालाच महाग

पडते. या कथानकात कर्नाड यांचे लक्ष अखेरच्या प्रसंगाने विशेष वेधून घेतले आहे.

पिता पुनातील आपली वये बदलण्याचा प्रश्न (Transplantation of age)

त्यांना विशेष भावला आहे. त्यातून त्यांनी माणसाच्या वैयत्तिक आणि सामाजिक

जबाबदारीचा प्रश्न निर्माण केला. पौराणिक कथेतून, नवी अभिव्यक्ती साधण्याचा

कर्नाड यांचा येथे प्रयत्न आहे. ययातीची सून, पुरुची पत्नी 'चित्रलेखा हिच्या

भावनांची विशेष कदर या नाटकात नाटककाराला करावयाची आहे. नवे प्रश्न

आणि संदर्भ निर्माण करावयाचे आहेत. राजा ययातीने आपल्या कर्माचे आणि पापाचे

ओझे बिचान्या पुरूवर लादले आहे; ही चित्रलेखेची खरी तगमग आहे. म्हणून ती

ययातीला रोखठोक सवाल करते. एक सून सासऱ्याला सरळ म्हणते, 'तुम्ही माझ्या

पतीचे यौवन हिसकावून घेतलंत त्या यौवनाला चिकटलेल्या इतर गोष्टींचा स्वीकार


आलेख

१७