पान:आलेख.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 देवयानीचा केवळ संजीवनी विद्येच्या प्राप्तीसाठीच ययातीने स्वीकार केला

हा एक नवा मुद्दा या नाटकात, शर्मिष्ठेच्या मुखाने कर्नाड यांनी उपस्थित केला

आहे. तर देवयानी ब्राह्मण कन्या आहे हे समजण्यापूर्वीच ययातीने तिच्या रूप

सौंदर्यावर भाळून तिचा स्वीकार केला आहे. 'मी वीरोचित पद्धतीने उजवा हात

धरुन देवयानीला कोरडया विहिरीतून वर काढले आणि तिच्या स्वर्गीय लावण्याने

दिपून गेलो' असे म्हणून देवयानीचा स्वीकार केल्याचे, या नाटकातील ययाती

सांगतो. शर्मिष्ठेला शिक्षा देणान्या देवयानीलाच उलट शिक्षा भोगावी लागते हे

ययातीने अचूकपणे ताडले आहे. यौवनगंधा शर्मिष्ठा तिला हार जात नाही.

'भुकेल्या कुत्र्याला पोणिमेचा चंद्र सुद्धा भाकरीच वाटतो' शर्मिष्ठेला देवयानीचे हेच

दर्शन घडते. आपले जीवन सर्वस्व अर्पण करूनही देवयानीने य: कश्चित काचोळी

साठी आपली सारी स्वप्ने तुडविली, याचा तिला अनावर राग येतो. देवयानीला

कोरडया विहिरीत ढकलून पुन्हा त्याच विहिरीवर प्रहरभर रडलेली ही शमिष्ठा,

देवयानीची खरी सखी होती. शर्मिष्ठेच्या या करूण कहाणीने ययाती पूर्णपणे विर-

घळतो. तिच्या विषयी त्याच्या मनांत अनुकम्पा निर्माण होते. या अनोख्या अनुभवाच्या

ओझ्याने तो पार दबतो. दास्याला सरावलेल्या शर्मिष्ठेला आपले स्वातंत्रशृंखले सारखे

वाटू लागते. कोरडया डोळयाते, कठोरपणाने जगाचा द्वेष करीत ती जगू लागते. आत्म-

हत्येचा प्रयत्न करते, पण तिचा उजवाच हात धरून ययाती विषाची कुपी बाजूला

फेकतो. पुन्हा त्याच्यावर उजवा हात धरल्याचे उत्तरादायित्वही येते. हे लक्षात आल्या.

मुळे देवयानी शर्मिष्ठेला हद्दपार करण्याची राजाज्ञा फर्मावते. स्वतंत्र होऊ इच्छिणान्या

शमिष्ठेचा, ययाती, पत्नी म्हणून स्वीकार करायला तयार होतो. उच्चारलेल्या

शब्दांना चिकटून राहण्याचे सामर्थ्य असलेली ही शमिष्ठा आहे ; म्हणून तिने एक.

टीनेच ययातीवर आपल्या शरीर सौंदर्याने न चेतविताही स्वामित्व मिळविले

आहे. या बोलण्याने देवयानीचा प्रक्षोभ अनावर होऊन ती गळयातील मंगळसूत्र

ताडकन तोडते. पुरूच्या व नव्या सुनेच्या स्वागताला नकार देते, आणि शुक्राचार्या-

कडे झेपावते. शर्मिष्ठा तिला अडविण्याचा प्रयत्न करते.

 या नाटकात एका नव्या तत्त्वज्ञानाने भारावलेल्या मन:स्थितीत कर्नाडांचा

पुरू वावरतो. त्याला आईची ओढ आहे, पण आपली आई कोण? हे गूढ काही

केल्या त्याला उलगडत नाही. एवढयात शमिष्ठा वेड्यासारखी आकरदंत शुक्राचार्यांनी,

ययातीला दिलेला वरु वृद्धत्वाचा शाप, पुरुला सांगते आणि त्याला उःशाप मागायला

भाग पाडते. पुरू कडून मान्न ययातीला सूडाखेरीज फारशी अपेक्षा नाही. देवयानीला

दिलेल्या जीवदानामुळे ययातीला उ:शाप मिळतो. त्याचे वृद्धत्व इतराने स्वीकारले

तरच आता त्याला पुन्हा यौवन मिळणार होते. पुरूला हे वृद्धत्व कोण स्वीकारील

ही शंका आहे आणि ययाती तर भलत्याच भ्रमात वावरत आहे.आपले वृद्धत्व


१६

आलेख