पान:आलेख.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




वते, ज्याची संवेदना मिळते ते महत्त्वाचे असते. मग सूक्ष्म भाग येथे स्थूल बनतो.

आणि रिक्त पोकळीतही नवा आशय, नवा प्राण भरता येतो.

 गिरीश कर्नाडांच्या नव्या चितनातून, शोधातून, एक नवे सूत्र आणि नवा

आकृतिबंध येथे साकार झाला आहे. या सर्जनशील उपाख्यानाकडे संस्कृत साहित्यि-

कांचे फारसे लक्ष गेले, नाही ही एक चकित करणारी वस्तुस्थिती आहे.

 महाभारत हे अनेक उपाख्यानांची खाण आहे, ते Episodic Epic आहे.

दुष्यन्त-शकुन्तला, नल-दमयंती, कच-देवयानी, ययाती-शमिष्ठा, सावित्री इत्यादी

उपाख्यानांचा निर्देश केला म्हणजे या गोष्टीची प्रचीती येते. प्रतिभावंतांनी आजवर

अनेक अंगांनी या उपाख्यानाचे माकलन करून घेऊन ती आपल्यापरीने फुलविली.

त्यातील कलात्मक बीजांना नवे अंकुर व पालवी त्यामुळेच फुटलेली दिसते. या उपा-

ख्यानांना आपआपल्या काळातील, लोकांच्या अभिरुचीनुसार, स्वत:च्या व स्वकाळा-

तील वाङमयीन समजानुसार व राजकीय, सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळा घाट

प्राप्त झाला आहे. मराठी प्रतिभेने तर ययाती उपारव्यानात विशेष रस घेतला आहे.

 कचोपारूयान, ययाती उपाख्यान आणि उत्तर यायात हे या उपाख्यानाचे तीन

भाग पडतात. पहिल्या कचोपाख्यान या भागात कच, देवयानी, शुक्राचार्य, वृषपर्वा

यांना महत्त्व आहे. कच शुक्राचार्यांकडे विद्या शिकण्यासाठी राहतो. आणि संजीव-

नी विद्याहरण करून निघून जातो, ययाती उपाख्यान हा जो दुसरा भाग आहे त्यात

कच, 'कोणताही ऋषिकुमार तुझ्याशी विवाहबद्ध होणार नाही' असा देवयानीला

शाप देतो. या पुढील कथाभाग आला आहे. त्यात देवयानी शर्मिष्ठा कलह, देवया

नीचे ययातीकडून पाणिग्रहण ययाती शर्मिष्ठा प्रणय, देवयानी शुक्राचार्य कोप, यया.

तीला वार्धक्याचा शाप, पुरूकडून ययातीच्या वार्धक्याचा स्वीकार इत्यादी प्रसंग

आले आहेत. या कथानकात ययाती, देवयानी, शर्मिष्ठा, पुरू, शुक्राचार्य व कच या

व्यक्तींना महत्त्व आहे. त्यात स्त्रीच्या स्वभावाचे, पुरूषी वृत्तीचे आणि एकूण

जीवन व्यवहाराचे सखोल दर्शन घडते.

 गिरीश कर्नाडांचे 'ययाति' नाटक याच कथाभागावर आधारित आहे. मात्र

त्यात त्यांनी एक नव्या संघर्षाला, चित्रलेखेच्या व्यक्तिमत्वाला नव्याने सजीव केले

आहे.

 प्रथमत:च येणाऱ्या युवराज पुरूला पाहण्यास देवयानी उत्सुक आहे. भोगा

प्रमाणेच दुःखांचीही चटक लागलेली ही. देवयानी आहे. शर्मिष्ठा देवयानीत खटके

उडतात.
आलेख

१५