पान:आलेख.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




या पौराणिक कादंबरीत गुणरूपच केवळ झाले. खांडेकरांची ययाती कादंबरी

म्हणजे एका कलावंताला गवसलेले सामर्थ्य आहे. खांडेकरांच्या प्रतिभेचा सर्वोच्च

पातळी वरील हाच श्रेष्ठ अविष्कार आहे. खांडेकरांच्या समाजचिंतनांचा मन:पूर्वक

आविष्कार त्यांना कच आणि ययाती या व्यक्तिरेखातून अत्यंत यशस्वीपणे करता

आलेला आहे.

'पुराणातल्या एका उपाख्यानांतील कथासूत्राचा आधार घेऊन लिहिलेली स्वतंत्र

कादंबरी आहे असे स्वतः वि. स. खांडेकरांनी चवथ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत

(पृष्ठ. ४५८) म्हटलेले आहे. त्यात स्व-तंत्रतेचा प्रत्यय या ययाती कथेच्या या

दोन अविष्कारातून येतो.


तीन

गिरीश कर्नाड.

 महाभारतातील ययाती उपाख्यानावर आधारित साहित्यकृतींमध्ये सुप्रसिद्ध

चित्रपट कलावंत आणि नाटककार श्री. गिरीश कर्नाड यांचे 'ययाति' नाटक कार

लक्षवेधी आहे. १९७१ साली विजापूरच्या श्री.रं.भिडे यांनी गिरीश कर्नाडाच्या,

मूळ कन्नड भाषेत लिहिलेल्या 'ययाति' नाटकाचा, अनुवाद मराठी रसिकांना सादर

केला. या नाटकाच्या संहितेचे वाङमयीन महत्व आणि कलात्मक मूल्य वाचता-

क्षणी लक्षात येते.

 अलिकडच्या काही वर्षात परप्रांतीय नाटककारांची नाटके मराठी रंगमंचावर

सादर झाली आणि गाजली.या नाटकांना मराठी कलाकारांबरीवरच मराठी प्रेक्षकांनी

ही उत्साहपूर्वक साथ दिली. मराठी रंगभूमीच्या वाहत्यासरितेत हा एक नवा

प्रवाह येऊन मिसळला आहे.उदा. आधे अधुरे, बांकी इतिहास, कांचन रंग, सुनोज-

नमेजय ही नाटके, या संदर्भात कर्नाडांच्या ययाति' चे मोल फार मोठे आहे.

 'ययाती हे उपाख्यान असल्यामुळे त्यात महाभारतापेक्षा आणखी स्वातंत्र्य

घेण्यास वाव आहे; (ययाती, प्रस्तावना). पण एक पौराणिक कथा, मीथ म्हणूनच

आपण महाभारताकडे, त्यातील उपाख्यानांकडेही पाहतो. उपाख्यानाचा ज्ञात तप-

शील वा तोंडावळा तसाच साहित्यिक कलावंत टिकवून ठेवतो. त्यात स्वत:चे रंग

भरतो. हे स्वातत्र्य ललित लेखकाला माहेच. एखाद्या मेकनोच्या खेळासारखी

ललित लेखक पुराणं कथांची, मीथची नवी जुळणी करीत असतो, त्यातून जे जाणा-


आलेख

१४