पान:आलेख.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




देव आणि शर्मिष्ठेच्या सौंदर्याला, सुरेल आवाजाला, आणि उदात्त प्रेमाला भाळ-

लेला आसक्त ययाती अशी व्यक्तिचित्रणे आलेली आहेत.

शिरवाडकरांनी एक काव्यत्स भावोत्कट नाट्य ययाती कथेतून साकार केले आहे.

कचाचे सात्विक मन आणि या मनाचे उदात्तिकरण पहिल्यांदा या कथानकात

होते. जे एक भव्य आणि उदात्त कचाचे दर्शन या नाटकातून घडते ते कचाच्या

उद्गारातूनन शोधात येईल.

कच:- देवी माझ्याशी पतीचं नातं जोडावं अशी तुझी इच्छा होती पण ती मला

सफल करता आली नाही. कोठलंही बंधन नसलेलं मैत्रीचं प्रेम, अनेक बंधनात

ओवलेल्या वैवाहिक प्रेमापेक्षा श्रेष्ठ, फार अधिक श्रेष्ठ आहे, असं मी मानतो.

हे प्रेम मी तुला-आणि फक्त तुलाच दिले आहे. तू काहीही म्हटलंस तरी कच

देवयानी हा समास काळालाही तोडता येणार नाही. तू हे नातं मनःपूर्वक स्वीका-

रलं असतंस तर ययाती बरोबर तुला सुखानं संसार करता आला असता, पण तसं

घडलं नाही. या अलौकिक प्रेमाची जात तू जाणली नाहीस?'

    (ययाति आणि देवयानी : अंक ३ पृष्ठ ५४)

हाच कच शवटी आपल्या सजीवनी विद्ये वा उपयोग याच देवयानीच्या प्रेमासाठी

तिचा शाप विफल करण्यासाठी करतो. नाटयांतर्गत न्यायात कलात्मक सुसंगती

येथे साधलेली दिसते
.

 सुखोपभोगाकडे धाव घेणारा कामुक प्रतिनिधिक बनलेला ययाती, उदात्त

गुणी शर्मिष्ठा, गविष्ठ दुष्ट देवयानी आणि परिपतप्रज्ञ' कच व अध्यात्मिक अति-

रेकाने बेताल झालेला यती या व्यक्तिरेखा ययाती कादंबरीतीलच आहेत. कच

आणि यती यांना त्याचप्रमाणे देवयानीला फारसे महत्त्व मूळात नसूनही खांडेकरांनी

ययाशी आख्यानात शर्मिष्ठा, कच, यती, देवयानी आणि ययाती यांना महत्त्व

दिलेले आहे. भोगी ययाती उदात्त कच आणि प्रणयिनी शर्मिष्ठा अहंकारी देवयानी

ही त्यांची निर्मिती आहे.

ययातीच्या पार्श्वभूमीत सामाजिक कादंबरीचे क्षेत्र माझ्या अभिव्यक्तीला अपुरे

वाटू लागले म्हणून पौराणिक कादंबरीकडे वळलो असे जे म्हटलेले आहे ते मान्य

करता येत नाही. त्याच प्रमाणे 'उपाख्यान म्हणजे मूळ कथा नव्हे म्हणून तीत

नक्कीच बदल करण्याचे स्वातंत्र्य घेता येईल' या युक्तिवादाचीही आवश्यकता

नव्हती. सरळच पुराणकथा अनुभूतीचा भाग बनल्यावर त्यातून नवनिर्मिती संभ-

वते. कादंबरीकार म्हणून खांडेकरांचे सगळे लेखनविशेष आणि गुणदोष सारेच


आलेख

१३