पान:आलेख.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




रेखा होतात. कचाच्या निमित्ताने तर आशय जिवंत आणि उदात्त स्वरूप धारण

करून प्रगट होतो. वि. स. खांडेकरांच्या ययातीशी समरस होऊन त्यांचे हे नाटक

जन्मले. महाभारतापेक्षा ययाती कादंबरीशी त्याची अधिक जवळीक आहे. शमिष्ठे

बद्दलची अनुकंपा म्हणूनच या नाटकात सहृदयाला विशेष जाणवते.

मद्य प्राशनाच्या निमित्ताने विवाहाच्या पहिल्याच सुहाग राती ययाती आणि देवयानी

मीलना ऐवजी एकमेकांपासून दूर जातात , देवयानीचा अहंकार, सदाचाराचा कैफ,

सत्ताधीशाची वृत्ती ययातीचा आपल्यावर रोष ओढवून घेण्यास कारणीभूत होते.

अशा अपेक्षाभंगानं विमनस्क एकाकी केविलवाण्या अवस्थेत सापडलेला ययाती

लावण्यवती आणि निष्ठावंत प्रेमाच्या नाजुक रेशमी धाग्यांचे मोहजाल पसर-

विणाऱ्या मिष्ठेकडे स्वाभाविकपणे आकर्षिला जातो कच आणि यती या दोन्

व्यक्तींच्या साहचर्यात, ययाती देवयानी या व्यक्तिरेखांच्या जीवनातील समसमांतर

नाटयाने अधिक उणा भाव उलगडतो. देवयानी आणि कच यांच्या परस्पर प्रेमाची

साक्ष पटते. ययाती आपल्या कहयातून निसटलेला पाहून असमर्थ आणि आगतीक

बनलेली देवयानीच शिरवाडकरांच्या या नाटकात ययातीला शाप देते कारण

ययाती पुरतेपणी शर्मिष्ठेकडे आकर्षिला गेला त्याच्या पासून शर्मिष्ठेला मुले झाली

हे देवयानीला कळून चुकले होते. शाप देणे एवढाच मार्ग तिला सर्व प्रकारच्या

विफलतेतून उमगला होता पण कच ते सुद्धा समाधान तिला लाभू देत नाही

स्वतःच्या तपःसामर्थ्याने तो देवयानीचे सारे तेज हिरावून घेतो अशी या नाटकाशी

एकूण संकल्पना आहे.

शेवटी कलावंत-लेखकाच्या मनात शिरतील ती त्याची पात्रे या न्यायाने पौराणिक

सत्याला जपणाची ही आवश्यकता शिरवाडकरांना वाटली नाही. देवयानी एका

उग्र तपस्व्याच्या तालमीत वाढलेली मुलगी म्हणून शाप देण्याइतपत सामर्थ्यवान

बनते. हेही घडू शकते असे मान्य करण्याची सोय कल्पनाजनित कलाकृतीत आहेच!

खांडेकरांच्या प्रभावाने संस्करित झालेली शिरवाडकरांची ययाती आणि देवयानी

ही अशीच मानस आपत्ये आहेत. शरीर भोगाच्या तत्त्वज्ञानाला सामोरा जाणारा

भोगलोलुप ययाती, मत्सरी, अहंकारी सूडाच्या भावनेने पेटलेली 'काळोख कन्या'

देवयानी, विशुद्ध प्रेमभाव आणि उदात्त ध्येयवाद एकवटलेला कच, दास्यत्व पत्क-

रावे लागलेली लावण्यवती, गानकोकिळा भावोत्कट पण विशुद्ध निरागस प्रेम

करणारी शर्मिष्ठा अशी या व्यक्तिरेखा आहेत. कच देवयानी आणि ययाती

शर्मिष्ठा यांच्या उत्कट प्रणयानुभूतीचे चित्रण शिरवाडकरांच्या नाटकात आलेले

आहे. दोन्हीही साहित्यकृतीत गर्विष्ठ अहंकारी देवयानी, उत्कटे जीवापाड प्रेम

करणारी समर्पणशील वृत्तीची शऱ्मिष्ठा, धीरोदात्त पण कमालीचा ध्येयनिष्टा,

चित्ताची एकाग्रता विचलित होऊ न देणारा पण सहृदयतेने प्रेम जागविणारा कच-


१२

आलेख