पान:आलेख.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




सु-संगत असा नवा तपशील त्याच्या भोवती उभारावा; अथवा मुळात असलेला परंतु विसंगत असा तपशील गाळावा, बदलावा यात काहीही वावगे नाही आणि नवीनही नाही. कालिदासासारख्या कवि कुलगुरूनेच ही स्वातंत्र्याची सनद नाट्य क्षेत्रासाठी मिळवून ठेवली आहे.' (पहिल्या आवृतीची प्रस्तावना.) पौराणिक ललित साहित्याकडे पाहण्याचा आपला कोणता दृष्टिकोन आहे आणि रसिकांचाही कोणता दृष्टिकोन असावा याचे इतके उत्तम आणि स्वच्छ मार्गदर्शन क्वचितच आढळत असल्याने त्याची मुद्दाम पुन्हा नोंद या ठिकाणी घेतली आहे.
प्रत्येक कलाकृतीचे एक स्व-तंत्र, खास वास्तव असते. त्या वास्तवातील अंतर्गत संगती शोधणे आणि ती असणेच महत्त्वाचे ठरते. ययातीकथेचा एक कादंबरी रूप आणि दुसरा नाट्यरूप आविष्कार शोधतांना दोन्हीही लेखकांच्या या भूमिकांनाच खरे महत्व आहे.
'भाऊसाहेब खांडेकरांनीही 'अभिज्ञान शाकुंतलम्' मधील कण्वाने सासरी जाणाऱ्या शकुंतलेला दिलेला आशीर्वाद महत्त्वाचा मानला आणि कालिदासाच्या 'ययातीला शर्मिष्ठा जशी प्रिय झाली. तशी तू आपल्या पतीला प्रिय हो' या उक्तीचे सखोल- चिंतन केले. त्यातून ययाती-शर्मिष्ठा प्रणय कथा उलगडली पण पुन्हा या चिंतनाला महायुद्धा नंतर बदललेल्या परिस्थितीची यंत्र-विज्ञान-अंतराळ युगातील माणसाच्या संयमविहीन सुखलोलुपतेची चाहुल लागली अनिबंध भोगलोलुपतेची जोड या चिंतनाला त्यांनी देऊ केली आणि समाजात 'कच थोडे ययाती फार' असेच चिन्न त्यांच्या प्रतिभेला दिसू लागले. यातून अनिबंध मनाला संयमाचा लगाम घालण्याची आवश्यकता भासली आणि त्यातूनच खांडेकरांच्या ययातीचा आविष्कार झाला. अनेकांना 'ययाती' कादंबरी संयमाच्या शिकवणुकीसाठी मार्गदर्शक आणि आदर्श वाटते. सद्यः-परिस्थितीत रणात गांजलेल्याना' एखाधा गीतारहस्यासारखा ययाती कादंबरीचा आधार वाटतो. याचे रहस्य ययातीच्या निर्मिती प्रेरणांमध्ये आणि पार्श्वभूमीमध्ये आहे. काळोखाच्या जगात एखादी तरी प्रकाशरेषा दिसावी अशी ज्यांची अपेक्षा आहे त्यांना ययाती कादंबरी ही प्रकाशरेखा म्हणून जाणवते. भाऊसाहेब खांडेकर आणि शिरवाडकर यांची विशिष्ट अनुभूती या ययाती कथेशी बांधली जाऊन तदाकार बनते. तादात्म्य वाटते तेव्हा मूळ कथेत स्वानफूल महत्त्वाचे बदल करण्याचे सामर्थ्य लेखकांत निर्माण झालेले असते याचा प्रत्यय ययाती कथेच्या या दोन अविष्कारातून येतो.
भन्यत्व आणि दिव्यत्वाचे जबरदस्त आकर्षण, चिंतनशील अंतर्मुख मनोवृत्ती हे शिरवाडकरांच्या मूलतः काव्यात्म असलेल्या प्रतिभेचे विशेष त्यांच्या 'ययाती देवयानी' नाटकातही दिसून येतात. त्यांच्या या नाटकातील व्यक्तिरेखा त्यांच्या प्रकृती आणि प्रवृतीच्या एकीकडे प्रतीक बनतात तर दुसरीकड}े त्या जिवंत व्यक्ति-

आलेख

११