पान:आलेख.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




अभिप्रेत असलेले अर्थ त्यात शोधण्याचा प्रयतंन् खांडेकर आणि शिरवाडकर यां

दोन्हीही लेखकांनी केलेला आहे. बदलल्या काळाप्रमाणेच बदलण्याच्या वाङमयीन

प्रेरणाही या ललित साहित्यकृतीच्यावर आपला संस्कार उमटवून जातात. रंजन

आणि उद् बोधनाची मूल्ये एकाचवेळी या दोन्हीही कलाकृतीत आढळतात; खांडे.

करांच्या ययातीत कदाचित ही मूल्ये अधिक प्रभावी वाटतात तथापि कलानिर्मिती

ही एक अंतः स्फूर्त आणि गूढ प्रेरणा आहे हे मान्य केल्यानंतर खांडेकर आणि

शिरवाडकर या कलावंत मनानी शोधलेल्या ययाती कथेत कलात्मक पातळीवरून

केलेल्या अभिव्यतीचा प्रत्यय येतो.

 महाभारतातील या ययाती उपाख्यानाला मराठी ललित साहित्यात लोकप्रिय

आणि कलात्मक स्वरूपात साकार करण्याचे श्रेय प्रथमत: वि. स. खांडेकराचेच

आहे. संस्कृतमधील साहित्यात कुठेही या आख्यानाचा आधार ललित साहित्य

निर्मितीसाठी घेतल्याचे आढळत नाही. त्यादृष्टीने खांडेकर या प्रतिभावंत मनाची

कलादृष्टी मान्य करावी लागते. मराठीत जर है. आख्यान कुणी लोकप्रिय केले

असेल तर ते खांडेकरांनीच! शिरवाडकरांनी 'किनारा' काव्य संग्रहात 'उषा स्वप्न'

मोठे भावतरल आणि नाजुक शब्दांनी रंगविले. त्या आख्यानाकडे लक्ष वेधल्याचे

जे श्रेय खांडेकर, त्यांचे लाडके साहित्यिक श्री. शिरवाडकर यांना देतात तेच श्रेय

खांडेकरांना द्यावे लागते,

 वि. वा. शिरवाडकरांनी ययाती आणि देवयानी नाटकाच्या पहिल्या आवृ-

तीच्या प्रस्तावनेत नि:संदिग्धपणे या गोष्टीचा उल्लेख केला आहे. आणि कला-

वंताच्या पौराणिक कथांवर आधारित सर्जनशील ललित साहित्याच्या निर्मितीच्या

संदर्भातील आपला दृष्टिकोनही आवर्जून प्रतिपादन केलेला आहे. तो मुळाबर

हुकूम उद्धृत करणेच इष्ट ठरते.

'महाभारतातील मूळ कथानक संक्षिप्त आणि स्थूल असले तरी कल्पकतेला आणि

नवीन अर्थ शोधाला आव्हान देण्याचे त्यातील सामर्थ अपार आहे. 'विद्याहरणा'

नंतर श्री. वि. स. खांडेकरांनी असा फार मोठा प्रयत्न आपल्या 'ययाति' या

कादंबरीत केला आहे. या कादंबरीनेच या नाटच लेखनास स्फूर्ती आणि पुष्कळसा

आधारही दिलेला आहे.

 'या नाटकासाठी महाभारतातील मूळ कथानकात काही महत्वाचे फेर बदल

केले आहेत. नाटकासाठी जे कार्यकारी सूत्र मी गृहीत धरले त्याच्या परिपोषासाठी

हे बदल मला आवश्यक वाटले. पौराणिक कथा या बहुतांशी काल्पनिक कथा

असतात. लेखकाने त्यातील आपल्याला उत्कटतेने जाणवेल असे सूत्र घेऊन त्याच्याशी


१०

आलेख