पान:आलेख.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 ययाती कथेला नवे वळण देऊन ललित लेखकांना असलेला 'सनद' शीर हक्क

खांडेकरांनी या कादंबरीत बजावला आहे. कामयज्ञ आरंभून अधिकच प्रज्वलित

करीत जाणारा ययाती आणि स्त्री सुखाची इच्छाच नसलेला 'यती' या दोघांचे

चित्र परस्पर विरोधाने अधिक खुलले आहे. ययाती व शमिष्ठेच्या निमित्ताने विविध

घटना प्रसंगाचे चित्रण करून त्या नव्याने प्रकाशात आणल्या आहेत.

 'कचा' ला खांडेकरांनी मनःपूत कल्पून ययाती कादंबरीत त्याला एक मह-

त्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. कचाशी खांडेकरांचे स्वप्न निगडत आहे;

ययाती'शी साजचित्र ! सुख भोगूनही अतृप्त, चुकते हे समजूनही स्वतःला'न सावर-

णारा हा ययाती आसक्तीकडून विरक्तीकडे जाऊ पाहणारा खांडेकरांनी निर्माण

केला आहे. त्याच्या चरित्रावरून उद्याच्या जगाचे भीषण भवितव्य जाणवावे ही

लेखकाची अपेक्षा आहे . मन मोकाट सुटलेल्याघोडयाप्रणाणे आहे, ते प्रयत्नाने आव-

रून संयमाचा लगाम या घोडयाला घालावा लागतो. हेच मानवतेला इष्ट आहे, असे

त्यांना सांगावयाचे आहे. ययाती कथेचा समाजाच्या प्रतिनिधी रूपात केलेला हा

आविष्कार हा ययाती कांदबरीला समाजमानसात स्थान देणारा भाग आहे.

 'भोग विरूद्ध संयम हा बोध ययातीच्या प्रतीकातून त्यांनी दिलेला आहे.

 वर्तमान दृष्टीतून ययातीसारख्या महाभारत कथेकडे पाहतांना असे होणेच

अपरिहार्य व स्वाभाविक आहे.


दोन

वि. वा. शिरवाडकर

 भाऊसाहेब खांडेकरांची ययाती (१९५९) आणि तात्यासाहेब शिरवाडकरांचे

'ययाती आणि देवयानी' (१९६६) हे महाभारतातील ययाती कथेचे दोन समर्थ

आविष्कार आहेत. एखादी साहित्यकृती मग ती ऐतिहासिक, सामाजिक वा पौरा-

णिक असो; ती मधील व्यक्तिरेखा या आलंबन-आधार असतात. साहित्यात

माणसाच्या मनाचा आणि जीवनाचा शोध घेतांना जे प्रत्ययकारी आकार-आकृती.

बंध कलावंताच्या हाती येतात तीच त्याची खरीखुरी अभिव्यक्ती असते.

 महाभारत हे संस्कृती-संचित स्वरूपी महाकाव्य आहे. राष्ट्रीय महाकाव्य

असे लोकमान्य टिळकांनी त्याला संबोधिलेल आहे. बदलल्या काळानुसार आणि

कलावंतांच्या व्यक्तिमत्वाच्या पृथगात्मतेनुसार या संचिताचा वापर केला जाणे

अपरिहार्य आहे. महाभारतातील प्रस्तुत ययाती कथेला अर्थ देण्याचा किंवा स्वतःला


आलेख