पान:आलेख.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




एका श्रेष्ठ रूपाचा प्रतिनिधी बनला. दोन नायिका म्हणून ययाती व कच हे दोन

नायकही हवे ही त्यांची कल्पना असावी. या कादंबरीतील कच नुसता ध्येयवादी,

विचारी, संयमी तरूण नसून तो देवयानीवर उदात्त निरपेक्ष प्रेम करणारा आहे.

 'कच हा आत्मविकासाची धडपड करणाऱ्या मानवाचा प्रतिनिधी' खांडेकरांनी

चित्रित केला आहे. तर 'ययाती हा अष्टौप्रहर सुख भोगण्याच्या निराधार नादात

आत्मलोपाला. अंतरिचा दिवा मालवायला प्रवृत्त झालेल्या मानवाचा प्रतिनिधी

आहे' असे ते दर्शवितात. 'आधुनिक मानवाचे मन हा एक अतृप्त, हिंस्त्र प्राण्यांनी

भरलेला अजबखानाच बनत आहे' ही वि. स. खांडेकरांची ययाती रूपातील अनुभूती

आहे.

 'अर्थ आणि काम यांच्या स्वर संचारावर आणि नग्ननर्तनावर ज्या समाजात

धर्माचे नियंत्रण नसेल. त्या समाजाचे अध:पतन आज ना उद्या झाल्याशिवाय

राहत नाही.'

 'ययाती कथेची चिरंतन स्वरूपाची ही शिकवण आहे. भारतीय समाजाला

तिचा केव्हाही विसर पडू नये ' ही ध्येयवादी खांडेकरांची सार्थ अपेक्षा या कादंब-

रीच्या आस्वादकांकडून आहे. हेच त्यांचे मार्गदर्शन आहे. प्रबोधन आहे. रंजक

कमेतून साकार झालेले !

 महाभारतातील ययाती कथेतील मानवी जीवनदर्शन यथार्थपणे टिपून खांडे.

करांनी या कथेतील व्यक्तीचे मन समरसून जाणले त्यातून नवा संदर्भ आणि अर्थ

ययाती कथेला त्यांनी प्राप्त करून दिला या अर्थानेच ययातीचे नवे कलात्म साहि-

त्यरूपही निर्माण केले आहे.

 काळ बदलतो. माणसे म्हटले तर बदलतात आणि स्थिर राहतात. पुराण-

काल आज नाही आणि पुराण कथेतील व्यक्त्तीही नाहीत, पण माणसाच्या आणि

जीवनाच्या प्रवृत्ती बदलत नसतात. आजच्या काळातील माणसांचा, भावभावनांचा

साक्षात्कार पुन्हा नव्याने पुराण काळातील माणसातही होऊ शकतो. याची जाणीव

ययाती कादंबरीवरून येते. मानवी जीवनातील चिरंतन मूल्यांना सारे वाङमय

व्यक्त करते. मग ती पुराणकथा असो वा महाभारत असो.

 खांडेकरांनी सामाजिक जीवनाशी आपली ययाती कादंबरी एक वेगळा मार्ग

स्वीकारून एकरूप केलेली आहे. ती मुख्यत्वेकरून ययातीचीच कथा आहे. केवळ

समाजाच्या प्रतीकाची नाही. म्हणून तीत कलात्मकता अवतरलेली दिसते. कल्प-

नारम्य खांडेकरांच्या व्यक्त्तित्वाला ययाती कादंबरीत खरा अवसर मिळाला आहे.

म्हणून ती काव्यात्म कादंबरी होते.

आलेख