पान:आलेख.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




ण्यासाठी समसमांतर असे 'कचा' चे उदात्त चित्रण ते करतात. खांडेकर शर्मिष्ठेला

एक आदर्श, त्यागी, सहनशील उत्कटत्वाने सर्वस्व समर्पण करुन महन्मंगल प्रेम

करणारी "चित्रित करतात. वस्तुतः स्त्री हृदयाची कोवळिक प्रत्ययाला

येण्याऐवजी तिची कठोरताच देवयानीला विहिरीत लोटण्याने व्यक्त

झाली आहे. पण अहंकारी व दुष्ट देवयानीच शर्मिष्ठेला कारुण्याकडे

वाटचाल करावयाला लावते असे त्यांच्या मनाने घेतले आहे. कलावंताच्या

मनांत जी रुजते ती त्याची व्यक्तिरेखा. मग तो त्याच त-हेने तिची मांडणी

करण्याच्या मोहात पडतो. त्याला अन्य पर्यायच शिल्लक नसतो. खांडेकरांनी सांगि-

तलेल्या या कादंबरीच्या पार्श्वभूमीवरुन या गोष्टीचा उलगडा होतो. व्यक्ति

चित्रणाची संगती लागते.

 कच अधिक उदात्त भूमिका घेतो. परिणत प्रज्ञ ध्येयनिष्ठ वाटतो. ययाती

भयंकर अधःपतित, भोगी बनतो, देवयानी कमालीची अहंकारी अहृदय, तर शर्मिष्ठा

आदर्श, उदात्त, निरागस प्रणयिनी बनते. कालिदासाने शांकुतलाच्या ४ थ्या अंकातील

७व्या श्लोकात कण्वाने दिलेला शकुंतलेला आशीर्वाद 'ययातिरिव शर्मिष्ठा भर्तुंर्बहु-

मता भव' हाच याला कारणीभूत आहे.

 वि.स.खांडेकरांनी असे एक मत मांडले आहे की, ययाती आख्यान है

उपाख्यान आहे. त्यात सर्व प्रकारच्या अपेक्षित बदलास मुभा असावी. कारण तें मध्य-

वर्ती कथानक नाही. या गृहीताने ययातीला मिष्ठा का प्रिय, याची कारणे शोधून ते

पहातात. देवयानीने झिडकारलेल्या ययातीला शर्मिष्ठा सर्वस्व वेचून सावरते.

स्वतःच्या पित्याच्या, शत्रुपक्षाच्या संवर्धनासाठी ती त्याग भावनेने देवयानीची दासी

बनते; शिवाय ती गाणारी मनोहारिणी लावण्यवती आहे. ययातीची प्रिया शर्मिष्ठाच

होऊ शकते.

 खांडेकरांच्या ध्येयवादाने अशी ही केवळ शर्मिष्ठाच, नव्हे तर संपूर्ण कादंब-

रीच घडविली आहे. 'देवयानीचे खरे प्रेम कचावर होते. ते तिचे पहिलेवहिले उत्कट

प्रेम होते. तिने ययातीशी लग्न केले ते महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन, तिने शर्मिष्ठेला

आपली दासी केले ते सूंडाच्या समाधानासाठी.' (पु.४५६, ययाती आ.४ थीं)

या खांडेकरांच्या दृष्टीतून देवयानी घडविली. ययानी कथेतील महत्त्वाची व्यक्ति

चित्रेणे अशी खांडेकरांच्या भूमिकेतून साकार झालेली आहेत. त्यामुळे गौण अन्य

पानांच्या बाबतीत त्यांनी घेतलेल्या मनसोक्त स्वातंत्र्याबद्दल वेगळे सांगण्याची

आवश्यकताच नाही : 'संजीवनी विद्येचे हरण करुन देवलोकी गेलेला महाभारता-

तील कच पुन्हा आपल्याला कधीच भेटत नाही! पण या कादंबरीत मी त्यांचे

उत्तर चरित्न अर्थात काल्पनिक चित्रित केले आहे;' म्हणजे त्यांचा कच प्रेमाच्या



आलेख