पान:आलेख.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




अर्थ शोधणे हे केवढे मोठे आव्हान आहे. ययातीचा भोग, देवयानीचा अहंकार,

शर्मिष्ठेचा प्रणय, कचाची उदात्त भक्ती एकच वेळेला भावनिक कलात्मक आणि

वैचारिक पातळीवरुन खांडेकरांना या कादंबरीत चित्रित करणे शक्य झाले आहे.

विविध दृष्टिकोन एकत्र गुंफण्याचा हा त्यांचा प्रयत्न स्तिमित करणारा आहे. एकाच

वेळी व्यक्तींच्या व्यक्तित्वाच्या गाभ्याला स्पर्श करुन त्यांना समाज वास्तवांचा प्रति-

निधी बनविण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. व्यक्ती म्हणून त्या जिवंत

होतात. सुख दुःखात तर रंगतातच, पण समाज वास्तवाचे उगवत्या नव्या काळाचे

प्रतिनिधित्वही करतात.

 देवयानी, शर्मिष्ठा, ययाती अशा क्रमाने खांडेकर विचार करीत गेले. पण

त्यांच्या ध्येयनिष्ठ, शिवत्वात सौंदर्य शोधणाऱ्या मनाला खरा अर्थ गवसला तो

कचाच्या उदात्त धीरोदात्त आचरणात ! त्यागी, निरपेक्ष प्रेमाच्या आत्मिक समा-

धान मानण्याच्या वृत्तीत ! कचाची ही उदात्त जीवन मूल्येच त्यांना कांदबरीत

प्रस्थापित करावयाची आहेत आणि त्यासाठी ययातीच्या सर्व प्रकारच्या भोगलो-

लुपतेचे परस्पर छेदक म्हणून विस्तृत वर्णन करावयाचे आहे. खांडेकरांच्या मनांत

भिनलेली सामाजिकता या कादंबरीलाही पुरतेपणी भिनलेली आहे. असे स्पष्टपणे

जाणवते. खांडेकरांच्या कल्पना विश्वास या कांदबरीतील व्यक्ती जीवन जगतात.

एका भारावलेल्या मनानेच त्यांनी ही कादंबरी एखाद्या सांगरुपकाप्रमाणे, विविध

सामाजिक प्रवृत्तीवर समग्न रुपक रचूनच लिहिली. व्यावहारिक 'स्वरुपातील जीवन

मूल्यांनाउदात्त रूप ते देतात.

 देवयानीचे दास्य स्विकारणाऱ्या शर्मिष्ठेची एक उदात्त प्रतिमा प्रथम खांडे

करांच्या मनांत निर्माण झाली. आपल्याला जाणवलेले शर्मिष्ठेचे हे रुप मुळाशी

सुसंगत की विसंगत याचा खल करीत न बसता त्यांसाठी नव्या घटना प्रसंगाची

जुळणीही ते करतात. देवयानीला निर्जन अरण्यातील विहिरीत लोटून शर्मिष्ठेचे

तेथून निघून जाणे या तिच्या निर्पण कृत्याचाही मग ते फारसा विचार करीत

नाहीत. जाणिवपूर्वक स्वतःच्या मनात साकार झालेल्या. ययाती कथेच्या आविष्का-

रासाठी त्यांना मूळ कथेत बदल करावे लागले आणि ते त्यांनी आनंदाने केले.

विशिष्ट, अभिप्रेत सामाजिक आशायाच्या आविष्कारासाठी नव्या प्रसंगांची आणि

'मंदार' 'माधवा' सारख्या नव्या कल्पनेतील व्यक्तींची ही त्यांना निर्मिती करावी

लागली. त्यामुळे ययाती खांडेकरांची ते म्हणतात त्या प्रमाणे, स्वतंत्र पौराणिक

कांदबरी बनली.

 ययातीला मूळापेक्षा अधिक भोगी चित्रित करतांना त्यांना भोगवृत्तीचे अगदी

तपशिलात जाऊन भडक वर्णन करावे लागले. विरोधातील सौंदर्य आविष्कृत कर,


आलेख