पान:आलेख.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




राखणारी ही कादंबरी क. वि. स. खांडेकरांच्या महनीय व्यक्ति मत्वाचा उतुंग-

अविष्कार आहे. आज सगळ्यात मोठे समाधान जर कोणते असेल तर 'याची देही

याची डोळा' खांडेकरांना ययाती कादंबरीने संपादन केलेले अजोड यश व त्यांनी

लोकमान्य आणि रसिकप्रियतेचा गाठलेला कळस त्यांना पाहवयास मिळाला, हे

होय. प्रा. नरहर कुरुंदकरानी 'धार आणि काठ' मध्ये खरा कलावंत हा रंजनाच्या

आणि बोधाच्या पलीकडे जाऊन, त्यावर मात करून आपली कलात्मक निर्मिती

करीत असतो अशा आशयाचे विचार मांडले आहेत. खांडेकरांची ययाती कादंबरी

या गोष्टीचा एक उत्तम पुरावा आहे असे या कादंबरीचा आस्वाद घेतांना जाण-

वते. खांडेकरांची ययाती कादंबरी म्हणजे मराठी पौराणिक कादंबरीच्या क्षेत्रा-

तील नव्या युगाचा प्रारंभ आहे.

 केवळ जुन्या वळणाप्रमाणे महाभारतातील ययाती कथेचा संक्षेप विस्तार

खांडेकर करीत नाहीत तर प्रतिभा बलाने या आख्यानातील कच, ययाती,देवयानी,

शर्मिष्ठा, यती, शुक्राचार्य इत्यादी व्यक्तींना नवे रुप, नवेरंग आणि नवे वळण

देतात. त्यांच्या प्रतिभेने निर्माण केलेली नवी अर्थपूर्ण अशी ही त्यांची मानस

अपत्ये आहेत. पौराणिक कथा यशस्वी, कलात्मक त-हेने साकार होण्यासाठी

अवश्य असलेल्या सर्व गुणांचा परमोत्कर्ष वि. स. खांडेकरांच्या ठायी आढळतो.

एरवी सामाजिक कादंबरीत जे दोषरुप ठरेल, उदा.- अद्भुतरम्य, स्वप्निल,

कल्पना प्रधान भावविश्वाचे आकर्षण, सुभाषितवजा वाक्यांची-विचारांची पर-

वरण, ललित मधुर आलंकारिक भाषेची मोहिनी, कल्पना सृष्टीचे ईश्वर'त्व'

इत्यादी या सर्वच गोष्टी खांडेकरांमध्ये आहेत आणि ययाती कादंबरीत त्या

नेमक्या गुणस्वरुप झाल्या आहेत. खांडेकर कादंबरीकार म्हणून संपूर्णपणे आणि

ख-या अर्थाने ययाती कादंबरीतून व्यक्त होतात.

 पौराणिक कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाला जसे काही प्रारंभ लाभ असतात

तशी कथा तपशील बदलण्याबद्दल धास्तीही वाटत असते. कधी कधी जनरुचि

संवाद आणि विसंवादांनाही सामोरे जावे लागते. कलावंताने कलानिष्ठ राहून

अंतर्गत सुसंगती असलेला नवा कलात्मक आकृती बंध नेहमीच शोधायचा असतो.

खांडेकरांनी याच भावनेने ययाती कथेला नवे रुप दिले आहे. माणसाच्या मनाचे

ऑणि जीवनाचे नव्या युगातील नवे आकार शोधण्याचा त्यांचा प्रयत्न येथे दिसतो

आहे.

 }'सत्तेचा ; वैभवाचा, सामर्थ्याचा आणि तारुण्याचा मनमुराद उपभोग घेऊनही

अतृत्प राहिलेला. ययाती पुन: एकदा तारुण्य मागतो आणि यौवनाच्या उंबरठयावर

उभा असलेला कोवळा पुरु ते देतो; ही घटनाच मोठी विलक्षण आणि त्यामागचा


आलेख