पान:आलेख.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


होतो, आणि खांडेकरांच्या मनोराज्यातील माणसाचे प्रतिनिधीत्वही करु लागतो.

हल्लीच्या या काळात 'कच थोडे ययातीच फार' आढळतात म्हणून या कादंबरीत

कचाचे मनःपूर्वक उदात्तीकरण खांडेकरांनी केले आहे. कचाच्या व्यक्तिरेखेला या

कादंबरीत महत्व प्राप्त होते.

 ययातीची भोग कथा, कचाची भक्ति कथा, शर्मिष्ठेची प्रणय कथा आणि

देवयानीची संसार कथा म्हणून ययाती कादंबरीकडे एकाच वेळी खांडेकर रसि-

कांना पाहायला लावतात. तेवढे सामर्थ्य निश्चितच त्यांच्या या कादंबरीत अवतर

लेले आहे. एवढा प्रचंड आवाका व जीवनानुभव स्वीकारूनही ययाती या कादंबरीत

अंतर्गत सुसंगतीचा प्रत्यय येतो. आशय व अभिव्यक्तीचे कलात्मक अभिन्नतेचे

नाते प्रत्ययाला येते. खांडेकरांच्या कलावंत मनाने केवळ कलाधर्मी (त्यांच्याही

नकळत) बनून ही अभिव्यक्ती केलेली आहे.

 'ययातीचे'.चित्र एक आसक्ती कडून अनासक्ती कडे जाणाऱ्या दीपस्तंभ

रुपात त्यांनी रेखाटलेले आहे. मानवतेच्या सर्व मुल्यांच्या प्रस्थापनेसाठी मोकाट

सुटलेल्या मनरुपी घोड्याला सुसंयमाचा लगाम घालणे त्यांना आवश्यक वाटते.

आजच्या काळाची ती गरज आहे. म्हणूनच या गरजेतून कचाची अत्यंत उदात्त,

त्यागी निरपेक्ष, आत्मिक समाधान मानणारी भूमिका त्यांना विशेष महत्त्वाची

वाटली आहे. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी मध्ये ही कचाचेच पात्र

अधिक उदात्त चित्रित झालेले आढळते.

 पुराण कथा (Myth) जेव्हा कलावंताच्या अनुभवाचा भाग होते अनु-

भवच ती पुराण कथा होते तेव्हा श्रेष्ठ, यशस्वी पौराणिक साहित्य कृती जन्मते.

पौराणिक व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाच्या गाभ्याला खराखुरा स्पर्श कलावंत जेव्हा

करतो तेव्हाच त्याला पौरणिक भावविश्व, वास्तव अबाधित ठेवून श्रेष्ठ अजरामर

व्यक्तींची चित्रणे साधतात. या दृष्टीने ययाती शर्मिष्ठा कचदेव यांनी शुक्राचार्य

यांच्या निमित्ताने मानवी मन आणि जीवनावर खांडेकरांनी टाकलेला प्रकाश झोत

विलोभनीय आहे. पौराणिक सत्याला, भावसत्यात परिणत करून त्याचे जिवंत

यशस्वी चित्रण ययाती कादंबरीत घडते. केवळ मनोरंजन वा समाज प्रबोधन या

कोणत्याही एकांगी मूल्याशी इमान न राखता ययाती कादंबरी या दोन्हीही मूल्या-

वर मात करून एक प्रतिभास निबंधित कलाकृती बनते. तिची अलोट रसिक-

प्रियताही या गोष्टीची साक्ष देऊ शकते. मराठी साहित्यातील सर्वात अधिक

रसिकमान्य कलाकृती म्हणून ययाती कादंबरीचा उल्लेख करावा लागेल.

 ययाती कादंबरीत एकाच वेळी कलात्मक रंजन, भावात्मक-आवहन, सामा-

जिक शिकवण आणि मानवी जीवन दरशन घडते. कलामूल्यांची पुरतेपणी बुज


आलेख