पान:आलेख.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





समाजाचा दैवदुर्विलास आहे. ज्याचे दुखणे त्यालाच घेऊन येथे मिरवावे लागते,

'जने तो जाणे । वांझोटी काय जाणे ।' हे खरे असले तरी याला कला चिंतनात

मान मर्यादित स्थान देता येत नाही.

 'दलित साहित्य' ही आता मराठी जगताने स्वीकारलेली एक जबरदस्त

साहित्य चळवळ बनली आहे. दलित साहित्यिकांच्या कलात्मक साहित्यनिर्मितीची

सर्वत चाह होत आहे. त्याला सर्वमान्यता मिळाली आहे. याचा रसिकांना सार्थ

अभिमान आहे. दलितात संस्कार, शिक्षण, नवनिर्मिती, साहित्यविचार प्रकाशन या

सर्वच क्षेत्रात नवजागरण घडून आले आहे ही चिकाटी आणि जिद्द निर्विवाद

दुर्मिळ आणि दुर्दम्य आहे. यास्तव पडले की मित द्यायची, वाटेल तेवढे सोसायची

तयारी आज आमच्या दलित बांधवांची आहे, समाज बदलण्याचा वसा त्यांनी

अंगिकारिलेला आहे. या प्रेरणेतूनच दलित कथा - कविता - वैचारिक वाङ्मय समृद्ध

संपन्न बनून अवतरत आहे. दलित कादंबरी आणि नाट्य-रंगभूमी विकसीत

होत आहे. या नवसाहित्याला, नवसमाज निर्माणात ऐतिहासिक

स्थान आणि कार्य आहे. भाजचे दलित साहित्य हे दलितांच्या जागृतीचे सुचिन्ह

आहे. ही घौडदौड चौफेर न थांबता होत राहिली पाहिजे आता सगळ्यांनी

जागे व्हायलाच हवे अन्यथा त्यांना तुडबून उखडून पुढेच जावे लागेल. मात्र

मराठी साहित्याकृतीची महत्वाची रेषा म्हणूनच दलित साहित्य गणले पाहिजे.

हा सवता सुभा होऊ नये. तरच कला आणि वाङ्मय विषयक सुजाण जाणिव या

साहित्यात गोचर होईल.

 नव्याने निर्माण झालेली ही दांडगी साहसी क्षमता सर्वसामर्थ्या निशी बाढलो

पाहिजे. सातत्याला महत्व आहे. दलितांच्या प्रामाणिक, 'स्व' निष्ठ जाणिवा

धारदारपणे अभिव्यक्त व्हाव्यात. १३ व्या शतकातील, ज्ञानेश्वर नामदेव चक्र-

धरांच्या काळात चोखामेळा, दासी जनी, गोरा, सावता, बँका यांचाही संत

(साहित्य) मेळा उदयाला आला होता. जागृत आत्मविश्वासाचे ते दलित होते.

तत्व चिंतनातून भाव सत्ये त्यांच्या वाणीत अवतरली हो दलित साहित्याला पूर्व

परंपरा आहे. धार्मिक प्रबोधन काळात या दलित साहित्य व साहित्यिकांना

बोलके होता आले याचे भान राखून तिच्याशी आपले नाते सांगितले पाहिजे,

दलित साहित्याच्या इतिहासात या 'स्वत्व'शील संत साहित्य मेळ्याची नोंद

व्हावी.

आलेख          १०१