पान:आलेख.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





आव्हान दिले आहे. आमचे साहित्य है साधन आहे. त्यातून समाज परिवर्तन

घडवून आणावयाचे आहे. त्यासाठी लेखणी हे हत्यार म्हणूनच उचललेली आहे.

प्रक्षोभ, संताप निर्माण करणे यासाठीच या दलित साहित्याचा जन्म आहे ही

भूमिका आता बळावली आहे. स्थिरावली आहे. यातूनच दलित आणि ललित

साहित्यातील दरी वाढत आहे.

 व्यवहारातील मुद्दा असा आहे की 'दलित' हे उपरोक्त अर्थाने साहित्याचे

विशेषण नसून समाजाचे विशेषण आहे. साहित्यात सौंदर्याच्या आधाराने जन्म-

लेली कलावसर, अनुभव, सौंदर्यानुभत्व, अटळ अपेक्षित आहे. दलितत्व' वा

ग्रामीणत्व मर्यादित वेगळेपण सूचित करण्यासाठी आहे. या वर्णनात्मक (Dis-

criptive) संज्ञा आहेत ही वस्तु स्थिती स्वीकारली पाहिजे. साहित्यात साहित्य-

पण, साहित्यगुण पाहिजे मग दलित साहित्याचीही त्यातून सुटका नाही.

 वाङ्मयीन किंवा साहित्याच्या व्यासपीठावरून बोलतांना कला-साहित्य-

विषयक प्रगल्भ समजुतीलाच अग्रस्थान दिले पाहिजे. लेखकांना समाजसुधारक,

क्रांतिकारक गणल्या पेक्षा सामाजिक राजकीय व्यासपीठा वरून शोषण, उपेक्षा,

अन्याय यांचा छडा लावला पाहिजे साहित्यिक आणि साहित्यिकांचे व्यासपीठ

त्याला पूरक आपोआप होईल. त्यासाठी त्याला वेठीला धरण्याची आवश्यकता

नाही. संस्कृती आणि साहित्य यांचे अन्योन्य संबंध पूर्वापार सर्वश्रुत आहेतच.

 आज या चळवळीला आक्षेपार्ह वाटणान्या पूरक न. ठरणाऱ्या प्राचीन

संस्कृतीतून उद्भवलेल्या प्राचीन संत साहित्याला कालबाह्य म्हणून त्यातील

काही गोष्टी भाग वगळून टाकण्याची भाषा वापरल्या पेक्षा त्याची 'प्राचीनता'

ध्यानात घेऊन प्रा. सरदारांनी सांगीतलेल्या ऐतिहासिक पद्धतीने काळसंदर्भात

परखड मूल्यमापन जरूर केले पाहिजे. कालबाहयता आपल्याला ओळखता आली

म्हणजे भाग वगळण्याचे प्रश्न उद्भवत नाहीत ही ओळख वाढवावी. प्राचीन संत

साहित्यावर नुसती आगपाखड करून चालणार नाही.

 केवळ दलित लेखकानेच निर्माण केलेले साहित्य म्हणजेच दलित साहित्य

असे समीकरण मांडता येणार नाही. दलित संवेदनशीलता असलेल्यांचे संवेद्य

साहित्य दलित साहित्य म्हणून स्वीकारण्याचे पुरोगामित्वही दाखविले पाहिजे.

लेखकाच्या जातीने दलित असण्यापेक्षा त्याच्या साहित्यातील स्पंदने दलित

असावी. लेखनगर्भ दलित चिंतनाला त्याच्या वृतिगांभीर्याला अधिक महत्व आहे.

दलितांनाच हातीबंडाचे निशाण घेऊन हा लढा उभारावा लागला. हा आमच्या

आलेख           १००