पान:आलेख.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





कादंबरीत झालेली दिसते. प्रमुख व्यक्तींशी त्याचे मर्म जाणून घेऊन शिवाजी

सावंत येथे समरस झाले आहेत. कृष्ण अश्वस्थामा, वृषाली, शोण यांच्या चित्रणा..

तून हे सुस्पष्ट होते. ते 'मृत्युंजय' कर्णाचे चित्र रेखाटतांना त्याच्या जीवनातील

संघर्षांचे व मनाचे कलात्मक दर्शन या कादंबरीतून घडवितात. येथे कर्णाचे उदात्त

चित्र साकार होते. कर्णाचे जीवन सतत शर्थीच्या झुंजीने भरले आहे. त्यांच्या

जीवनातील अंतीम क्षणच त्याला शोकात्मिकेचा नायक करतात हे त्यांना जाणवले

आहे. मृत्युंजय कादंबरीला म्हणूनच एखाद्या गद्य महाकाव्याचे किंवा महाकथेचे

स्वरूप प्राप्त झाले आहे. या महाकथेतून सावंतांनी, महाभारत कालीन संस्कृती व

वातावरण चित्रित केले आहे. म्हणूनच या कादंबरीला फार मोठे यश लाभू

शकले.


तीन दलित आणि ललित साहित्य


 आज दलित साहित्य बहुमुखी चर्चिले जात आहे. त्याचे स्वागत कौतुक

आणि मूल्यांकन होत आहे. आता पुनर्मुल्यांकन, फेरविचारांची प्रक्रिया सुरु होत

आहे. त्यानिमित्ताने काही विचार शलकांचे निर्देशन येथे करीत आहे.

 अखिल मराठी साहित्यातीलच दलित साहित्य ही एक निर्मिती आहे. तिचा

अलग विचार फार काळ करणे उपकारक ठरणार नाही.

 पौराणिक, ऐतिहासिक, ग्रामीण, प्रादेशिक स्त्रीयांचे, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे,

विदर्भातील वा मराठवाड्यातील साहित्य हे वेगळेपण आपण जसे मानतो तेवढयाच

मर्यादिपर्यंत दलित साहित्याचे आगळेपण लक्षात घेतले पाहिजे. दलित साहित्याचे

स्वरूप, प्रेरणा, प्रवृत्ती, प्रमेय, ठळकपणे लक्षात येण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.

 आज 'दलित साहित्य' या संकल्पनेत 'प्रत्यक्ष दलितांनी दलित चळवळीचा

पाठिंबा उभा करून प्रस्थापिताच्या विरुद्ध बंड उभारावे. विद्रोह, प्रक्षोभ साकार

करावा. वेदनांना वाचा फोडावी' ही गोष्ट अभिप्रेत आहे. नव्या समाजजागृतितून

जन्मलेले, नव्या जाणिवा प्रगट करणारे आगळे साहित्य ही कल्पना आता मागे

पडली आहे.

 साहित्याचे प्रयोजन, मूल्यमापन या संदर्भात आजवरची वाङ्मवसरणी

लाकारून दलित साहित्याने समीक्षकांना वाङ्मय मूल्यांचा फेरविचार करण्याचे

आलेख              ९९