पान:आलेख.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





नव्या जर्मनकवींना उद्देशून केलेलं आवाहन वाचलं...' हे केलेलं आवाहन वाचलं

आणि मग मात्र माझ मन महाभारतावरून पळभरही ढळायला तयार होईना.

महाभारतातील व्यक्तिरेखा पौराणिक कालखंडातील असल्यामुळे अद्भुताने भार-

लेल्या आहेत. म्हणून त्याच्या जीवन चरित्राचे अचूक धागे हस्तगत करणे त्यांना

प्रारंभी थोडे अवघड वाटले. याशिवाय खंडकाव्य नाटक कादंबरी अशा क्रमाने

कर्मकथेची गुंफन करण्याचा विचार सावंतांनी केला पण काव्य काय किंवा नाटक

काय आखून दिलेल्या मर्यादित जागेत रेखीव मंडलच तिथं घ्यावी लागतात. हें

लक्षात घेऊन सावंतांनी कर्णजीवनरुपी राजवस्त्राच्या धाग्यांचा उलगडा करण्या-

साठी कादंबरीचे विस्तृत क्षेत्र निवडले. महाभारतातील वास्तवाचे आणि कर्णच्या

व्यापक जीवनाचे चित्रण करण्यासाठी कादंबरी या वाङ्मय प्रकाराचा घाट त्यांना

सर्वतोपरी उपकारक ठरला आहे.


कर्णविषयक चिंतन


 कर्ण हा खरोखरच कादंबरीचा केंद्र बिंदू होऊ शकतो काय ? असा हा प्रश्न

मृत्युंजयकारांच्या मनांत निर्माण झाला. त्याच्या उत्तरातच या कादंबरीचें सुयश

सामावलेले आहे. सावंतांनी कर्णाचि सद्गुण त्याच्या जीवनातील समर प्रसंग त्याची

झालेली उपेक्षा या सर्व गोष्टींचे चितन केले आहे. आपल्या मनाशी कोणतीही

निश्चित खुणगाठ बांधून ते कर्णाला सामाजिक प्रवृत्तीचा प्रतिनिधी करीत नाहीत

किंवा दृष्टान्त म्हणूनही त्याचा वापर करीत नाहीत. त्यांना कर्णं हा एक जीवन

भर पिचलेला महायोद्धा वाटतो. कर्णासाठी कृष्णाने गूढ माघार स्वीकारली. कृष्ण

शिष्टाईच्या वेळी त्याला मानाने राजरथात बसवून घेतले या गोष्टीचे शोध-

तांना कर्णाची महती त्याच्या नजरेत भरली. श्रीकृष्ण फक्त एका कर्णाच्याच

मृतदेहाला अग्नि संस्कार देतो ! या घटनेचाही एक नवा अन्वयार्थ त्यांना उमगतो

आणि एकूण महाभारतात कर्णाला 'सघन' स्थान आहे हे त्यांच्या लक्षात येते तेच

या कादंबरीत टीपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यासाठी कर्णाच्या व्यक्तित्वाची

उत्तुंग शिखरे त्यांना शोधावी लागली. दुर्गा भागवतांनी 'कासपवति द्रौपदीच्या

सुप्त मनात कर्णाला स्थान आहे असे जे म्हटले आहे त्याचे सावंतांनी चिंतन केले

आहे.

 कृष्ण-परशुराम या दैवी पुरुषांच्या सहवासात हा कर्ण वावरला. केवळ

नियतीने घेरल्यामुळेच तो कौरवात मिसळला तरीही तो १ ला कौंतेय, सूर्यपुत्र

आहे. हे जाणवते. कृष्ण आणि कर्ण एकाच तात्विक भूमिकेच्या पौरुष चैतन्याचा

आणि वर्ण निर्भयतेच्या दोन बाजू आहेत ही एक महत्त्वाची नवी जाणीव त्यांना या


आलेख        ९८