पान:आलेख.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





भारत निष्ठांच्या टीकेसही पात्र झाली आहे. 'मृत्युंजय' कादंबरीत सावंतांनी

'अर्जुनाला सामान्य चित्रित केले आहे. द्रोणाचार्यांनी कर्णाला आपल्या वर्गात न

घेता कृपाचार्यांच्या सामान्य वर्गात घातले. अश्वस्थामा कर्णाचा जिवलग मित्र

होता. कौरवपांडवातील वैर पेटविण्यास कर्ण मुळीच जबाबदार नव्हता. कर्णाचा

मूळ स्वभाव शांततापूर्ण होता. कृष्णाला कर्णाविषयी आंतरिक ओढ वाटत होती.

सावंतांनी 'मृत्युंजय' कादंबरीत हे सारे नव्याने समाविष्ट केले आहे. एक ललित

साहित्यकृती म्हणून 'मृत्युंजय' कादंबरीचा विचार केला तर पौराणिक वास्तवाला

सजीव करणारी, कर्ण कहाणीतील नवे भावनाट्य आणि विचारनाट्य फुलविणारी

ती प्रदीर्घ कथा आहे, हे जाणवते. महाभारतातील कर्मकथेचा एक नवा आविष्कार

'मृत्युंजय' कादंबरीसारख्या प्रतिभाजनित नव्या आविष्कारांनीही महाभारतात

लाक्षणिक अर्थाने वाढ केली आहे. शिवाजी सावंतांनी आपली भूमिका 'सोबत

मधील एका लेखात (मी, माझे वाचक आणि टीकाकार शिवाजी सावंत सोबत

दिवाळी अंक १९७३ पृ. ५८) समर्पक शब्दात मांडली आहे. मानवी मन, जीव-

सृष्टी, निसर्ग' यांचेच प्रगटन ललित लेखक कोणत्याही निमित्ताने करीत असतो.

साहित्य म्हणून माणसेच हे प्रगटन वाचीत असतात.' 'निर्माणासाठी केवढे पिचावे

लागते हे एखादाच बंकिमचंद्र जागत असतो. एखादा 'प्रल्हाद' मने जाणत असतो.

बाकीचे शब्दांचे अनंत फुलोरे फुलवितात.' 'मृत्युंजय व स्वामी यासारखी पुस्तके

सुखासुखी वाचकांसमोर कधीच येत नसतात. त्यांचे मूल्यमापन तेवढयाच दर्जाचे

व्हावे एवढीही माफक अपेक्षा कलावंत मनाने करावी की नाही ?' असा त्यांचा

सवाल आहे. सावंतांच्या या मतातून कलात्मक सत्याची आणि वाङ्मयीन रह-

स्याची उकल होते. त्यांनी साहित्यिकाला होणाऱ्या विरोधाची जाण ठेवूनच

आपली भूमिका येथे विशद केली आहे. मृत्युंजय कादंबरीच्या विवेचनात या भूमि-

केला निश्चितच महत्व प्राप्त होते.


कादंबरीकारांच्या जाणिवा


 'मृत्युंजय' ही कर्णाच्या भावजीवनाची प्रदीर्घ कथा आहे. सावंतांना महा-

भारत हा अक्षम्य हेळसांड झालेला इतिहास वाटतो. 'व्यासांच्या सर्वस्पर्शी प्रतिभेनं

आणि त्यांच्यानंतर अनेक बुद्धिमंतांच्या प्रज्ञेनं जतन केलेला महाभारत हा प्रत्येक

भारतीयानं अभिमान बाळगावा असा या देशाचा धगधगीत 'इतिहास' आहे....

चित्रथरारक आणि रोमांचक ! : (अर्घ्यदान). महाभारत हे चैतन्याचे आगर

आहे या साक्षात्काराने सावंत महाभारताच्या चिंतनाकडे वळले. त्यातूनच मृत्युंजय

साकार झाली आहे. ते अर्घ्यदानात म्हणतात, ९८४६ साली महाभारताचं परि-

शीलन करण्यासाठी भारतात येऊन गेलेल्या ॲडाल्फ हाल्ट जमन या जर्मनकवीने


आलेख          ९७