पान:आलेख.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 अन्यन्यसाधारण व्यक्तित्वाच्या मीष्माने अजोड प्रतिज्ञा केली. या घटनेचा

दबदबा फार मोठा आहे. म्हणून भीष्म आदर्शवादाकडे झुकलेली व्यक्तिरेखा आहे.

'कल्पना साहित्यिकांच्या ठिकाणी दृढमूल झालेली असल्याने आज पर्यंत भीष्मा-

विषयी आदरच वाटत आला आहे. पण भीष्माचे मोठेपण आणि जगलेले सामान्य

जीवन आता हळूहळू मराठी साहित्यिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. भीष्माच्या

अद्भुत व्यक्तिमत्त्वाचे आणि मानवी पातळीवरून आवाहन निर्माण होत अस

ल्याचे या साहित्यावरून लक्षात येते. भीष्माच्या व्यक्तिमत्वात एकाच वेळी अद्-

भुत, अलौकिक आणि सामान्य व्यावहारिक पातळीचे दर्शन घडते. प्रखर नाट्याला,

उत्कट काव्याला आणि मानवी जीवन मूल्यांना आवाहन करण्याचे सामर्थ्य त्याच्या

जीवनात आहे. याची जाणीव भीष्म विषयक मराठी ललित साहित्यातून निश्चित-

पणे व्यक्त होते. मात्र भीष्माच्या जीवन पटावर आधारित स्वतंत्र साहित्यकृती

अद्याय निर्माण झाली नाही हेही लक्षात येते.


दोन 'मृत्युंजय'कार शिवाजी सावंत

 मराठीतील 'ययाति' कादंबरी नंतर पौराणिक कादंबरीचा नवा मानदंड

म्हणजे 'मृत्युंजय' ही कादंबरी. हाडाच्या कलावंताला कलानिर्मितीसाठी केवढे

पिचावे लागते. याची कल्पना भव्योदात्त कर्णाच्या व्यक्तिरेखेवरून येते ती याच

कादंबरातून. म्हणून प्रस्तुत लेखात मृत्युंजय कादंबरीचा आस्वाद सादर केला

आहे.

 १९६९ साली श्री. शिवाजी सावंत यांनी कर्णाच्या जीवनावरील आपली

मृत्युंजय कादंबरी परिश्रमपूर्वक लिहून पूर्ण केली. महाभारतीय पौराणिक वासवाशी

आणि कर्णाच्या भावविश्वाशी समरस होऊन कर्णकथेचा लालित्यपूर्ण आविष्कार

या भावकथेतून सावंतांनी केला आहे. कर्णावरील आजवरच्या मराठी साहित्याचा

( ललित ) साकल्याने विचार करताना एक लक्षणीय व गाजलेली साहित्यकृती

म्हणून मृत्युंजयचा उल्लेख करावा लागेल.

 कर्णाचा जीवनसंग्राम चित्रित करणारी ही कादंबरी वाङ्मयीन मूल्याची

जाण आणि भान ठेवून लिहिली आहे.


साद पडसाद


 कोणत्याही लेखनवृत्तीचे निर्मितीनंतर साद-पडसाद उमटतातच. एवढी.

रसिकप्रियता मिळविणारी ही कारंबरी अ. दा. आठवले यांच्या सारख्या महा


आलेख          ९६