पान:आलेख.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





लांची पराकाष्टा आणि त्याविषयीची खंत व्यक्त करतात. 'मधु भोसले यांच्या

'पितामह भीष्म' या कवितेतही 'भीष्माजवळ देण्यासारखे खूप काही होते, पण ते

देता आले नाही आणि घेणाराही भेटला नाही.' हे दुःख व्यक्त झाले आहे. वाळ-

शास्त्री हरदास, शं. के. पेंडसे यांनी पराक्रमी, त्यागी भीष्माच्या व्यक्तिमत्त्वाचे

दर्शन घडविले आहे. आनंद साधले, स्वतंत्रपणे भीष्माचे चित्रण करीत नसले तरी

त्यांना भीष्माचे निःस्पृह अर्पण त्यागी जीवन विशेष जाणवले आहे. 'हा जय'

नावाचा इतिहास आहे;' या लेख संग्रहात विवेचनाच्या ओघात आनंद साधले

लिहितात, 'निरपवाद नि:स्वार्थतेचा घमघमाट भीष्माचार्याच्या वृत्तीत दरवळतांना

दिसतो.' असेच भीष्मदर्शन बहुतांश मराठी लेखकांना घडलेले आहे. प्रत्येकाने ते

आपल्या स्वतंत्र भाषा शैलीने साकार केले आहे. संगीत 'मत्स्यगंधा कार 'य. ना.

टिपणीस आणि वसंत कानेटकर यांनी मात्र सत्यवती व भीष्म यांच्यातील संघर्ष

विस्तृतपणे विचारात घेतला आहे. टिपणीसांनी भीष्माला गौरी सारखी प्रेयसी

चित्रित करून भीष्माच्या त्यागाला आणखी एक पैलू पाडला आहे. शंतनूलाही

त्यांनी प्रेम जाणणारा आणि जपणारा राजा म्हणून नव्याने चित्रित केले आहे. तर

वसंत कानेटकरांनी नव्या जागृत स्त्रीच्या रुपात सत्यवतीला पाहिले आणि जागृत

स्त्री म्हणून तिथे चित्र रेखाटले आहे. नव्या बदललेल्या मूल्यांचे आरोपण महा-

भारत कथेतून साकार केले. पराशर आणि अंबा यांच्या उपकयांचा मांधार घेऊन

भीष्म आणि सत्यवतीच्या जीवनातील संघर्ष अधिक तीव्रतेने चित्रित केला आहे.

 भीष्म त्याच्या प्रतिज्ञेसाठी आणि त्यांगासाठी प्रतीक स्वरूपात मराठी ललित

साहित्यिकांना जाणवला असल्याने भीष्माच्या समग्र जीवन कहाणीकडे त्यांचे

दुर्लक्ष झालेले दिसते. अन्यथा या भीष्माच्या जन्मापासून त्याच्या शेवटच्या मरण

प्रसंगा पर्यंत नाटच आणि संघर्ष भरलेला आहे. हर्षामर्षांचे, सुखदुःखाचे काव्यात्म

प्रसंग त्याच्या जीवनात सर्वत्र पुरेपूर भरलेले आहेत. पण कर्णाने मराठी प्रतिभेला

एक शोकनाट्याचा नायक म्हणून जसे आकर्षित करून घेतले आहे तसे भीष्माच्या

विषयी अजूनतरी मराठी प्रतिभेचे लक्ष वेधले गेले नाही. भीष्माच्या जीवनातील

कारुण्य, खंत मराठी प्रतिभेच्या नजरेतून मात्र सुटलेली नाही. तो इरावती कर्वे,

डॉ. वाळिंबे, दूर्गा भागवत, मधु भोसले यांनी व्यक्तही केलेले आहे ही विशेष

लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे.

 'मोडेल पण वाकणार नाही' या बाण्याचा त्याग, कर्तव्य या जीवनमूल्यांचा

एक अजरामर आदर्श निर्माण करणारा म्हणून भीष्म या साहित्यिकांच्या जास्त

लक्षात राहीला. असामान्य आणि अलौकिक महापुरुष म्हणून भीष्माकडे आदर

श्रध्दा मुक्त भावनेने पाहिले जाते पण सूक्ष्म निरीक्षण केले तर भीष्माचे जोवन


आलेख             ९४