पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जबाबदारीचें व खर्चाचें काम आम्ही पतकरले असून आमच्या बंधुभगिनींच्या उदार आश्रयानें लवकरच आमचें ओझें हलकें होईल अशी आम्हास बळकट आशा आहे. या पुस्तकाची प्रशंसा आम्ही करण्याचें प्रयोजन राहिलें नाहीं. याच्या शेवटीं छापलेले प्रशंसापर अभिप्राय वाचल्यावर प्रत्येकास हें पुस्तक आपल्याजवळ, इतकेंच नव्हे तर, प्रत्येकाजवळ असणें इष्ट आहे असे वाटल्यावांचून राहणार नाहीं. सर्व वाचक हस्तें परहस्तें मदत करून आम्हांस प्रोत्साहन देतील अशी आशा बाळगतों. या पुस्तकाचें गुजराथीखेरीज करून इतर कोणत्याही भाषेत भाषांतर प्रसिद्ध करण्याची इच्छा असणारांनीं आमच्याकडे पत्रद्वारें खुलासा करून घ्यावा. विशे- षतः हिंदी व कानडी भाषेत हे पुस्तक प्रसिद्ध होणें इष्ट आहे. हल्लीं छपाईचा खर्च फार वाढला आहे तथापि या पुस्तकाची किंमत शक्य तितकी कमी ठेविली असून आमच्या महाराष्ट्रीय बांधवांनी आह्मांस उदार आश्रय द्यावा अशी विनंति करतों. लक्ष्मी बाग, भटवाडी, मुंबई नं. ४. } ६ व्ही. प्रभा आणि कंपनी.