पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना.

1031 जसे देवांचे अवतार कांहीं विशिष्ट महत्कार्यसिद्धयर्थ- जगांत दुष्टांचें दमन व शिष्टांचा प्रतिपाळ करण्यासाठीं-होतात, तसाच प्रकार कित्येक ग्रंथांसंबं धानेंही केव्हां केव्हां घडलेला दिसून येतो. ह्मणजे कांहीं विशेष ईश्वरी योजनेनें समाजांतलें एखादें व्यंग दूर करण्यासाठी असे ग्रंथ लिहिण्याची स्फूर्ति लेख- काचे ठाय होत असते. तसा प्रकार माझे मित्र रा. 'ऋग्वेदी' यांच्या आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहासासंबंधानें माझ्या अंतर्दृष्टीला दिसतो. मला अगदर्दी मनापासून वाटतें कीं, रा. 'ऋग्वेदी ' यांना हे पुस्तक लिहिण्याची जी बुद्धि झाली, ती अगदीं समयोचित स्फूर्तीनंच झाली आहे; इतकेच नाहीं, तर सध्यांच्या परिस्थितींत असे पुस्तक लिहिण्याचें काम दिनावधीवर टाकणें अक्षम्य झालें असतें. आज शाळांतून शिकणाऱ्या आमच्या मुलांमुलींची किंवा पोक्तपणानें समाजांत मिरविणारांची आम्ही काय स्थिति पाहतों? मराठी सहावी इयत्ता शिकणाऱ्या एका मुलीला गुढीपाडवा कधीं येतो, असा प्रश्न मीं एकदां सहज केला असतां तिला तें चटकन् सांगतां येईना; व इंग्रजी पांचव्या इयत्तेतल्या एका विद्यार्थ्याला दिवाळी अगोदर कीं दसरा अगोदर, ह्या प्रश्नानें दोनचार मिनिटें घोटाळ्यांत घातले होतें! ज्या व्यक्ति आज मुलगे किंवा मुली ह्मणविल्या जातात, त्याच दहा पांच वर्षांत समाजांत अग्रगण्य गणिल्या जावयाच्या आहेत. हल्लींची पोक्त वयाचीं माणसें अशाच रीतीनें वयानें व प्रतिष्ठेनें वाढलीं आहेत, व हाच क्रम पुढे चालविण्याची कांहीं तरी तजवीज हल्लींच्या शिक्षणपद्धतींत करून ठेवण्यांत आली आहे काय? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आमच्या देशांत पाश्चात्य शिक्षण सुरू झालें तो दिवस एका अर्थानें जसा मोठ्या भाग्याचा, तसाच दुसऱ्या एका दृष्टीने अत्यंत दुर्भाग्याचा ह्मणण्याची पाळी आलेली पाहून मन दुःखानें उद्विम होतें. इंग्रजी शिक्षणानें आमच्या एका डोळ्याला सतेज केलें, आणि त्याला त्याबरोबर आमच्या आपलें भविष्य दुरून पाहण्याचे सामर्थ्य दिलें; · गतकालीन इतिहासाकडे सप्रेम दृष्टीने पाहणाऱ्या दुसऱ्या नेत्राची शक्ति मात्र अत्यंत निष्ठुरपणानें हरण केली! त्यामुळे आमच्या समाजाच्या पूर्वपरंपरेविषयीं, ७