पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकाशकांचे दोन शब्द. या पुस्तकाची पहिली ३००० प्रतींची आवृत्ति आर्यधर्म विचारक मंडळीनें ता. २२ एप्रिल १९१६ रोजीं छापून प्रसिद्ध केली. त्यांनी वाचकवृंदास उद्देशून खालीं लिहिल्याप्रमाणें आपले विचार प्रगट केले होते:—(6 ',"

रा. 'ऋग्वेदी ' यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेला हा आर्योच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास महाराष्ट्रभाषाभिज्ञ वाचकवर्गाचे स्वाधीन करण्यास आज आम्हांस आनंद वाटत आहे. रावबहादूर अण्णासाहेब महाजनी यांच्या अभिप्रायांतील शब्दांत सांगावयाचें म्हणजे " चैत्रापासून आरंभ करून दरमहिन्यांत कोणकोणते सण पाळण्यांत येतात, त्यांचा शास्त्रोक्त विधि, चालू रूढी, प्रांतपरत्वें विधिभेद, पूर्वेतिहास, चालू रूढींत कोणते फरक करणे इष्ट आहे, इत्यादि सूचना अशी या ग्रंथाची रचना आहे. पूर्वेतिहास मिळविण्या- करितां ग्रंथकारांनों पुष्कळ परिश्रम केले आहेत. वेद, ब्राम्हणें, उपनिषदें, सूत्रे, काव्यें, पुराणें, मेगस्थनीस, ह्युएनत्स्यंग, यवनप्रवासी यांचे ग्रंथ, अलीकडील प्राचीन इतिहासाची माहिती-नाणीं, लेणीं, अवशेष, यांच्या सहाय्याने झाली ती-यांचा आधार घेऊन वर्णन केले आहे. " हें वर्णन किती सार्थ आहे या संबंधानें या पुस्तकाच्या शेवटीं दिलेले विद्वज्जनांचे अभिप्राय व रा. रा. वासुदेव- राव आपटे यांची विद्वत्ताप्रचुर सुंदर प्रस्तावना ह्यांवरून वाचकांची सहज खात्री होईल. ग्रंथकर्त्यांच्या परिश्रमाचें चीज करणें सर्वथैव महाराष्ट्राच्या हार्ती आहे. आणि ज्या महाराष्ट्रास भूषणभूत असलेल्या ज्ञानदेव, तुकाराम, रामदास, मुक्ताबाई, जनाबाई वगैरे महानुभावांच्या धार्मिक बुद्धीचा यशोदुंदुभि दिगंतरीं गाजत आहे त्याच महाराष्ट्राची सदैव जागृत असलेली धर्मबुद्धि या स्वधर्म- विषयक पुस्तकाचा आनंदानें गौरव करील असा आम्हांस पूर्ण भरंवसा आहे." प्रकाशकांनी प्रदर्शित केलेली आशा फलद्रूप झाली व एका वर्षाच्या आंत सर्व प्रति संपल्यामुळे एक अत्यंत उपयुक्त पुस्तक मिळेनासे झाले. या प्रकारचें समाजांत चैतन्य उत्पन्न करणारें पुस्तक प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या संग्रहीं असणें आवश्यक आहे असे वाटल्यावरून तें पुनः छापून प्रसिद्ध करण्याचें किंचित् ५